Saturday, February 21, 2026

ऐन पावसाळ्यात वीज वितरण कंपनी , महापालिकेच्या बेजबाबदार कारभारामुळे नगरकर त्रस्त

पावसाळ्यात वीज मंडळ आणि महानगरपालिकेच्या बेजबाबदार कारभारामुळे अहिल्यानगरकरांची कुचंबणा- अँड.रवींद्र शितोळे

नगर – सुमारे एक ते दीड महिन्यापासून वीज मंडळाच्या बेजबाबदार कारभारामुळे अहिल्यानगर त्रस्त झालेले असताना भर उन्हाळ्यात काहीही पूर्व सुचना न देता वीज पुरवठा खंडित होत होता.त्यामुळे बालके,वृद्ध आजारी नागरिक ज्यांना उष्णता,उच्च रक्त विकार , हृदयरोग असणारे नागरिकांना अतिशय त्रासाला सामोरे जावे लागलेले आहे.
आता पावसाळा सुरू झाला आहे.शहरात थोडा जरी पाऊस आला तरी वीज पुरवठा खंडित होतो की केला जातो? असा प्रश्न उपस्थित होतो.अशा वेळी संबंधित कार्यालयाशी समक्ष ,फोन,भ्रमणध्वनी चे माध्यमातून तक्रार करण्यासाठी संपर्क केला असता फोन एक तर बंद असतो अथवा सतत तो उचलून ठेवल्याने लागत नाही. समक्ष गेल्यास बरेचदा कोणी भेटत नाही.किंवा मनुष्यबळ कमी आहे असे सांगितले जाते.
पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित झाल्यावर बरेचदा बिलामध्ये पाणी गेल्यामुळे साप,नाग, उंदीर, घुशी यासारखे सरपटणारे प्राणी बाहेर पडतात.त्यामुळे सर्प दंश सारखे प्रकार होऊ शकतात.त्यातच शहरात रस्त्याची कामे सुरु असल्याचे,पूर्वीचे खड्डे आहेतच त्यामुळं अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
वरील समस्यांकडे महानगरपालिका,वीज मंडळ याचे दुर्लक्ष झालेले दिसते. तरी वीज मंडळाने सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी आणि महानगरपालिकेने खड्डे त्वरित बुजविण्याचे काम करावे. अन्यथा, नागरिकांना कायदेशीर ,सनद शील मार्ग अवलंब करावा लागेल , असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते ऑड. रवींद्र शितोळे यांनी दिला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles