नेवासा तालुक्यामध्ये गावठी कट्टा (अग्निशस्त्र) बाळगणा-या आरोपीविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 01 गावठी कट्टा व 02 जिवंत काडतुसे हस्तगत,
मा. श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.
सदर आदेशानुसार श्री किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/समीर अभंग, पोलीस अंमलदार दिपक घाटकर, ह्रदय घोडके, सोमनाथ झांबरे, भिमराज खर्से, शाम जाधव, प्रशांत राठोड, मनोज साखरे, योगेश कर्डीले यांचे पथक तयार करुन सदर पथकास नेवासा तालुक्यामध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले होते.
दिनांक 04/03/2026 रोजी नमुद पथक हे सोनई पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे सतिष विश्वनाथ कसबे रा.मोरेचिंचोरे, ता.नेवासा हा त्याचे कमरेला गावठ्ठी कट्टा लावुन मोरेचिंचोरे गावचे शिवारात ओढ्याजवळ फिरत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने बातमीतील ठिकाणी मोरेचिंचोरे गावचे शिवारात ओढ्याजवळ सापळा लावला थांबले असता. तेथे एक इसम संशयीतरित्या फिरत असतांना दिसुन आला. सदर इसमास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नांव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नांव सतिष विश्वनाथ कसबे वय- 30 वर्षे रा. मोरेचिंचोरे ता.नेवासा जि. अहिल्यानगर असे असल्याचे कळविले. सदर इसमाची झडती घेतली असता त्याचे कमरेला 1) 30,000/- रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल (अग्निशस्त्र), 2000/-रु कि. चे दोन जिवंत काडतुसे, असा एकुण 32,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला आहे. ताब्यातील इसमाकडे अग्निशस्त्र कोणाकडुन आणले याबाबत विश्वासात घेवुन विचारपुस करता त्याने सदरचे अग्निशस्त्र इसम नामे अमोल रावसाहेब विटनोर रा.मांजरी ता. राहुरी जि. अहिल्यानगर(फरार) याचेकडुन आणले असल्याचे सांगितले आहे.
ताब्यातील इसमाविरुध्द पोहेकॉ/437 सोमनाथ आसमानराव झांबरे नेम – स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन सोनई पोलीस ठाणे गु.र.नं. 86/2026 आर्म ऍ़क्ट 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन करीत आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने मागिल एका महिन्यात 05 गावठ्ठी कट्टे व 09 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असुन यापुढे गावठ्ठी कट्टे कब्जात बाळगणारे इसमांचे माहिती काढुन त्यांचेविरुध्द कारवाई करण्यात येणार आहे.
सदरची कारवाई श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.


