कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षा श्रीमती रोहिणीताई सचिन घुले, उपनगराध्यक्ष श्री.संतोष आप्पा मेहेत्रे यांच्यासह एकूण ११ नगरसेवक व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी काल भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.
या पक्षप्रवेशानंतर, सर्व नगरसेवक व कर्जत तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्या समवेत काल मुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांची औपचारिक भेट घेतली.
यावेळी मा.मुख्यमंत्री महोदयांनी सर्व नवप्रवेशितांचे स्वागत करून त्यांना पुढील राजकीय कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या, व कर्जत शहराच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत नगर पंचायतीच्या राष्ट्रवादी शरद पवार गटातील आणि काँग्रेसच्या 11 नगरसेवकांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, विजय चौधरी आदी या वेळी उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या नगरसेवकांचे पक्षात स्वागत केले. श्री. बावनकुळे यावेळी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश वेगाने प्रगती करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विकसित भारताच्या प्रयत्नांना समर्थ साथ देत आहेत. यामुळेच वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत. आजच्या प्रवेशामुळे कर्जत – जामखेड मतदार संघातील राष्ट्रवादी शरद पवार गट पूर्णपणे मोकळा झाला आहे.


