Saturday, February 21, 2026

अहिल्यानगर जिल्हा परिषदेत १५८ नवनियुक्त आरोग्य सेवकांना समुपदेशनाद्वारे पदस्थापना

नवनियुक्त आरोग्य सेवकांना समुपदेशनाद्वारे पदस्थापना

अहिल्यानगर,– जिल्हा परिषद, अहिल्यानगर अंतर्गत पुरुष आरोग्य सेवकांची सरळसेवा भरती–२०२३ अंतर्गत अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची जिल्हा परिषदेच्या सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली समुपदेशनाद्वारे पदस्थापना करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली आहे.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकुमार नेहरकर उपस्थित होते.

समुपदेशन प्रक्रियेपूर्वी संपूर्ण जिल्ह्यातील रिक्त पदांची स्थिती सर्व उमेदवारांना स्क्रीनवर दाखविण्यात आली. अंतिम निवड झालेल्या १८२ उमेदवारांपैकी समुपदेशन प्रक्रियेसाठी एकूण १५८ उमेदवार उपस्थित होते. त्यापैकी हंगामी फवारणीच्या कामाचा अनुभव असलेले २० उमेदवार उपस्थित होते. उपस्थित उमेदवारांपैकी दिव्यांग ६ उमेदवार, माजी सैनिक १६ व इतर १३६ उमेदवार होते. तसेच २४ उमेदवार समुपदेशन प्रक्रियेसाठी गैरहजर होते. दिव्यांग उमेदवारांना प्रथम समुपदेशनाची संधी देण्यात आली. तद्नंतर इतर उमेदवारांना गुणानुक्रमे संधी देण्यात आली. तसेच गैरहजर उमेदवारांना प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने उपलब्ध पदांनुसार पदस्थापनेचे ठिकाण देण्यात आले. समुपदेशन प्रक्रिया पूर्ण झालेल्या उमेदवारांना तातडीने नियुक्ती आदेश देण्याची कार्यवाही जिल्हा परिषद प्रशासनामार्फत सुरू असल्याचेही कळविण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles