Thursday, February 19, 2026

महावितरण कंपनीत २५० जागा भरणार,इलेक्ट्रिशियन, वायरमन व अन्य पदे भरली जाणार

वर्धा : प्रत्येक बेरोजगार युवकास नौकरी मिळण्याचे स्वप्न असते. त्यातही सरकारी नौकरी मिळत असेल तर त्यासाठी उड्या पडत असल्याचे चित्र नवे नाही. जाहिरात केव्हा व कुठे येणार, याकडे हे गरजू लक्ष ठेवून असतात. पण सर्वांनाच याची माहिती मिळत नाही. अशीच ही सरकारी नौकरीबाबत जाहिरातीची माहिती आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड म्हणजेच महावितरण किंवा महाडिस्कोम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंपनीने पद भरतीची जाहिरात काढली आहे. पात्रता फक्त आयटीआय एव्हढीच आहे. एकूण २४९ पदांची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ही भरती इलेक्ट्रिशियन, वायरमन व अन्य ट्रेड मध्ये केल्या जात आहे. यासाठी ईच्छुक उमेदवार हे महाडिस्काम डॉट इन या वेबसाईट वर भेट देत अर्ज करू शकतात. अंतिम मुदत १० जून अशी आहे.

एकूण २४९ पदे आहेत. इलेक्ट्रिशियन साठी ११० पदे, वायरमन साठी १०९ व अन्य ३० पदे भरली जाणार. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना पात्रता ठेवण्यात आली आहे. त्यांनी मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय पात्र असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान १८ वर्ष असले पाहिजे. तर अधिकाधिक हे वय २७ वर्षापर्यंत असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय नियमानुसार वयाची सवलत दिली जाईल.

भरतीत उमेदवारांची निवड ही गुणवत्तेच्या आधारे केल्या जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. भरतीसाठी लेखी परीक्षा नाही. मात्र शैक्षणिक गुणवत्ता महत्वाची. म्हणजे शैक्षणिक गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी महावितरण कंपनी तयार करणार. उमेदवारांची कागदपत्रे २१ ते २३ जून दरम्यान तपासल्या जातील. म्हणून ईच्छुक उमेदवारांनी वेळेत आपली कागदपत्रे तयार ठेवणे आवश्यक आहे. महत्वाची कागदपत्रे म्हणजे आय टी आय प्रमाणपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, लागू असल्यास जात प्रमाणपत्र व निवासी दाखला.

अर्ज करण्यासाठी ईच्छुक उमेदवारांनी प्रथम महाडिस्काम या वेबसाईटला भेट देणे. त्यानंतर त्यावर असलेल्या होम पेजवर करिअर किंवा अप्रेन्टेशिप या विभागास क्लिक करावे. पुढे या पद भरतीशी संबंधित लिंकवर क्लिक करावे आणि सूचना वाचन करावे. यावेळी सूचना वाचून इच्छुकांनी अर्ज भरावा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी. आणि हा अर्ज सबमिट झाल्यावर त्याची प्रिंट काढून जवळ ठेवावी.

Related Articles

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles