Friday, February 20, 2026

जामखेड येथे स्वस्तात सोने देण्याचे आमीष दाखवून दरोडा टाकणारे 3 आरोपी जेरबंद

जामखेड येथे स्वस्तात सोने देण्याचे आमीष दाखवून दरोडा टाकणारे 3 आरोपी जेरबंद
स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरची कारवाई

प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, यातील फिर्यादी श्री.राजेंद्र दिलीप मैड, वय 35,रा.आश्वी, ता.संगमनेर,जि.अहिल्यानगर यास महिला आरोपी नामे अश्विनी हिने फिर्यादीस 150 ग्रॅम सोने 10 लाख रूपये असे स्वस्तात देण्याचे आमीष दाखवून दिनांक 14/05/2025 रोजी फिर्यादीस कुसडगाव, ता.जामखेड येथे बोलविले.फिर्यादी पैसे घेऊन आल्यानंतर महिला आरोपी अश्विनी व तिचे 8 ते 10 साथीदारांनी फिर्यादीस मारहाण करून त्यांचेकडील 10 लाख रूपये रोख रक्कम, सोन्याचे दागीने व मोबाईल असा मुद्देमाल जबरीने चोरून नेला.याबाबत जामखेड पोलीस स्टेशन गुरनं 266/2025 बीएनएस 310 (2) प्रमाणे दरोडयाचा गुन्हा दाखल आहे.

दरोडयाच्या गुन्हयांची प्राथमिक माहिती मिळताच मा.पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस तात्काळ तपास पथके नेमून गुन्हयाचा तपास करणेबाबत आदेश दिले.त्यानुषंगाने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई/अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, गणेश लोंढे, रोहित मिसाळ, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब खेडकर, अमोल कोतकर, बाळासाहेब गुंजाळ, रमीजराजा आत्तार, विशाल तनपुरे, मनोज लातुरकर, सुनिल मालणकर,मेघराज कोल्हे, उमाकांत गावडे, अरूण मोरे अशांचे पथक गुन्हा उघडकिस आणणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.

दिनांक 15/05/2025 रोजी पथक जामखेड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गोपनीय व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे गुन्हयातील आरोपीचा शोध घेत असताना नमूद गुन्हा हा 1) विकास काज्या काळे 2) जरेणी विकास काळे दोन्ही रा.पोंदवडी, ता.करमाळा, जि.सोलापूर 3) वनिता रामचंद्र पवार, रा.सरदवाडी, ता.जामखेड 4) सोन्या शिवाजी काळे रा.सदफडोह, ता.करमाळा, जि.सोलापूर अशांनी त्यांचे साथीदारासह केला असून ते जवळा, ता.जामखेड येथे येणार असल्याची माहिती मिळाली.मिळालेल्या माहितीवरून पथकाने जवळा, ता.जामखेड येथे आरोपीतांचा शोध घेऊन 1) सोन्या शिवाजी काळे, वय 28 2) अभित्या शिवाजी काळे, वय 32, दोन्ही रा.सरफडोह, ता.करमाळा, जि.सोलापूर 3) शुभम रामचंद्र पवार, वय 18, रा.सरदवाडी, ता.जामखेड, जि.अहिल्यानगर अशांना ताब्यात घेतले.

पथकाने ताब्यातील आरोपीतांना विश्वासात घेऊन गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा 4) विकास काज्या काळे (फरार) 5) जरेणी विकास काळे (फरार) 6) लालासाहेब काज्या काळे (फरार) 7) किरण काज्या काळे (फरार) अ.क्र.4 ते 7 रा.पोंदवडी, ता.करमाळा, जि.सोलापूर 8) वनिता रामचंद्र पवार, रा.सरदवाडी, ता.जामखेड (फरार) 9) दिक्षा रामचंद्र पवार, रा.सरदवाडी, ता.जामखेड (फरार) 10) सुनिल शिवाजी काळे, रा.सरफडोह, ता.करमाळा, जि.सोलापूर (फरार) 11) रेश्मा सुनिल काळे, रा.सरफडोह, ता.करमाळा, जि.सोलापूर (फरार) अशांनी मिळून केला असल्याची माहिती सांगीतली.ताब्यातील आरोपीस गुन्हयाचे तपासकामी जामखेड पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्हयाचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर, मा.श्री.विवेकानंद वाखारे, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles