खासदार निलेश लंकेचा जिल्हा शल्य चिकित्सकांना पत्र, सीसीटीवी फुटेज व भिक्षेकरूंवर उपचार केलेले आयपीडी पेपर ची मागणी
जिल्हारुग्णालयात ४ भिक्षेकरू उपचारादरम्यान मृत्यू झाला, ही घटना संशयाच्या भोवऱ्यात आहे. या घटनेची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. झालेला संपूर्ण घटनाक्रम संशयाच्या भोवऱ्यात आहे. त्यासाठी खासदार लंकेंनी पत्र लिहून खालील मागण्या करण्यात आल्या आहेत
 १- Casulaty Ward (नंबर १) चे सीसीटीवी फुटेज
२- beggar Ward च्या आतील बाहेरील सीसीटीवी फुटेज
३- भिक्षेकरूंना ठेवण्यात आलेल्या किव्वा उपचार केलेल्या इतर खोली/ वार्ड चे सीसीटीवी फुटेज
४- भिक्षेकरूंवर केलेल्या उपचाराचा तपशील (IPD पेपर/ नोट्स)
ही सगळी माहिती मिळाल्यानंतर या सीसीटीवी मधे काही संशयित आढल्यास हा मुद्दा राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून निष्पक्ष चौकशीची मागणी तसेच दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहे


