श्रीरामपुर शहरात अवैधरित्या नशेचे इंजेक्सन/बॉटल्या विकणा-या औषध विक्रेत्यावर छापा टाकुन त्यांचेकडुन एकुण 31,370/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई.
अहिल्यानगर जिल्हा घटकामध्ये मा. श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी नशेचे इंजेक्शन/पदार्थ विकाणा-या विरोधी विशेष मोहिम राविणेबाबत आदेश दिलेले आहे.
सदर आदेशानुसार पो.नि. श्री किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी श्रीरामपुर हद्दीतील अवैधरित्या नशेचे इंजेक्शन/बॉटल्या विकणा-या इसमांची माहिती काढून कारवाई करणेबाबत पोउपनि/दिपक मेढे, पोलीस अंमलदार, विजय पवार, राहुल द्वारके, रिचर्ड गायकवाड, सुनिल मालणकर, रमीझराज आतार चंद्रकांत कुसळकर यांना सुचना देवुन रवाना केले.
सदर पथक हे श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या नशेचे बॉटल्या/इंजेक्शन विकणा-यांची माहिती घेत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली इसम नामे खंडाळा गावचे शिवारातील शिव मेडील चे मालक पंकज चव्हाण हा त्याचे मेडीकलमध्ये नशेकरीता वापरल्या जाणा-या बॉटलीची विक्री करीत आहे. सदरची बातमी मा. पो.नि. श्री कबाडी सो, यांना कळविले असता त्यांनी खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या.
त्यानुसार पथकातील पोउपनि/ दिपक मेढे यांनी तात्काळ औषध निरीक्षक श्री सोमनाथ मुळे यांना बोलावुन घेवुन त्यांना बातमीतील हकिगत समजावुन सांगितली त्यानंतर एक डमी गि-हाईक तयार करुन त्यास शिव मेडीकल मधुन नशेची बॉटली खरेदी करण्यासाठी पाठविले व पोलीस स्टाफ व औषध निरीक्षक असे मेडीकलच्या बाजुला दबा धरुन बसले. डमी गि-हाईकास शिव मेडीकलचे मालकाने नशेची बॉटलीची बॉक्स दिल्याने तात्काळ पोलीस पथकाने व औषध निरीक्षक यांनी शिव मेडीकल येथे जावुन छापा टाकुन शिव मेडीकलचे मालकास ताब्यात घेवुन त्यास पोलीस स्टाफ, औषध निरीक्षक व पंचाची ओळख समजावुन सांगुन त्यांचे नांव पत्ता विचारले असतांना त्यांनी त्यांचे नांवे 1) पंकज राजकुमार चव्हाण वय-21 वर्षे रा. खंडाळा ता. श्रीरामपुर असे असल्याचे सांगितले. तेव्हा त्यांचे व मेडीकलची झडतीचा उद्देश समजावुन सांगुन सदर इसमांचे मेडीकल व घराचीची झडती घेतली असता तेथुन एकुण 31,370/- रुपये किमतीचा नशेकरीता वापरल्या जाणा-या बॉटल्या व रोख रक्कम जप्त करण्यात आले आहे.
ताब्यात घेतलेल्या आरोपी यांचे विरुध्द स्थानिक गुन्हे शाखेचे पोकॉ/203 रमीझराजा रफीक आतार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन गु. र. नं. 914/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123,125,278 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.


