सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्राने जानेवारी महिन्यात आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली होती. त्यानंतर आठवा वेतन आयोग लागू करण्यासाठी हालचाली सुरु आहे. त्यामुळे लवकरच हा नवीन ८वा वेतन आयोग लागू होऊ शकतो. यामुळे केंद्र सरकारचे कर्मचारी अन् पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये चांगलीच वाढ होणार आहे. जवळपास १ कोटींपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. दरम्यान, २०२६ पर्यंत आठवा वेतन लागू केला जाऊ शकतो. आतापर्यंत दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू केला जातो. सहावा वेतन आयोग हा २०६ रोजी लागू करण्यात आला होता.त्यानंतर २०१६ मध्ये सातवा वेतन आयोग लागू केला. त्यानंतर आता २०२६ मध्ये आठवा वेतन आयोग लागू केला जाईल. ७ व्या वेतन आयोगाबाबत घोषणा ही २०१४ रोजी घोषणा केली होती. त्यानंतर दोन वर्षांनी हा वेतन आयोग कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आला होता.
सातव्या वेतन आयोगाचा कालावधी हा १० वर्षांचा आहे. हा कालावधी ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपणार आहे. त्यानंतर जानेवारी २०२६ पासून आठवा वेतन आयोग मोजला जाईल. दरम्यान, या वेतन आयोग कधी लागू केला जाईल याबाबत घोषणा झालेली नाही. आठवा वेतन आयोग लागू करण्यापूर्वी समिती स्थापन केली जाते. ही समिती कर्मचाऱ्यांच्या पगाराचा आढावा घेते त्यानंतर त्यात किती वाढ करायची याचा प्रस्ताव देते. त्यानंतरच आठवा वेतन आयोग लागू केला जाईल.
मिडिया रिपोर्टनुसार, आठवा वेतन आयोगामुळे फिटमेंट फॅक्टर २.२८ वरुन २.८६ पर्यंत वाढू शकतो. जर फिटमेंट फॅक्टर २.८६ झाला तर कर्मचाऱ्यांचा मूळ पगार जो १८००० रुपये आहे त्यांचा पगार ५१,४८० रुपये होऊ शकते. कर्मचाऱ्यांच्या पगारात १८६ टक्क्यांनी वाढ होऊ शकते. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.


