Thursday, March 12, 2026

आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाचा निर्णय! सरकारने उचलले मोठे पाऊल

आठव्या वेतन आयोगाबाबत केंद्र सरकारने महत्त्वाची पाऊले उचलली आहेत. केंद्र सरकारने लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना खुशखबर दिली आहे. आठव्या वेतन आयोगासाठी कर्मचारी आणि पेन्शनधारकांकडून सूचना मागवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.याच माध्यमातून भत्ते, वेतन आणि पेन्शनमध्ये बदल केले जातात. याचा थेट परिणाम ४८ लाख कर्मचारी आणि ६७ लाख पेन्शनधारकांवर होणार आहे.आता केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगासाठी ऑनलाइन पोर्टल सुरु केले आहे.याचसोबत ३० एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांना आपल्या सूचना देण्यास सांगण्यात आली आहे.

आठव्या वेतन आयोगात कर्मचारी आणि पेन्शनधारकांकडून सूचना मागवल्या आहेत. यामध्ये केंद्र सरकारचे औद्योगिक, बिगर औद्योगिक कर्मचारी, केंद्रशासित प्रदेशांचे कर्मचारी, सर्वोच्च न्यायलय, विविध मंत्रालये, सरकारी विभाग यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत. आयोगाच्या म्हणण्यांनुसार कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि अपेक्षा समजून घेण्यास मदत होईल. यामुळे शिफारसी चांगल्या पद्धतीने तयार होतील.

सूचना तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने द्यायच्या आहेत. कर्मचारी 8cpc.gov.in किंवा innovateindia.mygov.in या वेबसाइटवर जाऊन हे काम करायचे आहे. यासाठी तुम्हाला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर रजिस्टर करायचा आहे. MyGov खात्यात लॉग इन करा. हे पोर्टल ३० एप्रिलपर्यंत सुरु राहिल. तोपर्यंत कर्मचाऱ्यांना आपल्या सूचना द्यायच्या आहेत.

या सूचना लक्षात घेतल्यानंतरशिफारसी तयार केल्या जातील. या शिफारसी तयार करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी दिला आहे. त्या अनुषगांने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. या शिफारसी सादर केल्यानंतर आठवा वेतन आयोग लागू केला जाईल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles