मंत्रीपदाचा राजीनामा, संतोष देशमुख प्रकरणात होणारे गंभीर आरोप, करुणा शर्मांचे आरोप अशा कोणत्या ना कोणत्या कारणाने वादाच्या भोवऱ्यात अडकलेले अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे आता मन:शांतीकडे वळाले आहेत. धनंजय मुंडे आता इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात दाखल झाले आहेत . धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचे खाते राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांना देण्यात आले .त्यानंतर धनंजय मुंडे थेट विपश्यना करण्यासाठी इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात गेल्या आठ दिवसांपासून असल्याची माहिती समोर आली आहे .
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे क्रूर छायाचित्र आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर धनंजय मुंडेंना अन्न व नागरी पुरवठा खात्याचा राजीनामा द्यावा लागला होता .संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते .राजीनाम्यानंतरही करुणा मुंडे यांच्या गंभीर व खळबळ जनक आरोपांमुळे धनंजय मुंडे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात अडकले होते . दरम्यान, राजीनाम्यानंतर अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना दिल्यानंतर मंत्रिमंडळात पुन्हा येण्याची मुंडेंची आशा मावळल्याची चर्चा आहे .
मागील आठ दिवसांपासून अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे नाशिक मधील इगतपुरीच्या विपश्यनाकेंद्रामध्ये दाखल झाले आहेत .बीड मधील संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये त्यांच्यावर गंभीर आरोप झाले होते . नंतर धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता .गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने चर्चेत असलेले धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या खात्याची जबाबदारी अजित पवार गटाच्या छगन भुजबळ यांना दिल्यानंतर धनंजय मुंडे आता थेट विपश्यना करण्यासाठी इगतपुरीच्या विपश्यना केंद्रामध्ये गेले आहेत . इगतपुरीच्या विपश्यनाकेंद्रात दहा दिवसांच्या विपश्यनेसाठी ते दाखल झाल्याचा सांगण्यात येतंय .


