शेतक-यांना खते-बियाणे, किटकनाशके संघटनेचे आवाहन
नगर :- या वर्षी सर्वत्र वेळेवर मोठया प्रमाणात पाऊसास सुरुवात झाल्यामुळे खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात कृषी निविष्ठांची मागणी होत आहे. खरीप हंगाम सुरळीत पार पडावा या बाबत अहमदनगर डिस्ट्रीक्ट फर्टिलायझर्स, सीडस अॅण्ड पेस्टीसाईडस् डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष छबुराव हराळ, सेक्रेटरी अमित कासार, संग्राम पवार व खजिनदार धनंजय जोशी यांनी सांगितले की शेतकर्यांनी बियाणे खरेदी करताना अधिकृत परवानाधारक कृषी विक्रेत्यांकडूनच बियाने खरेदी करावीत, पक्के बिल घ्यावे, बिलावर लॉट नंबर टाकुन घ्यावा, एम.आर.पी पेक्षा जादा भावाने बियाणे खरेदी करु नयेत, बाजारात आनेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात सर्व प्रकारचे शासनमान्य बियाणे उपलब्ध करुन दिली आहेत तरी शेतकर्यांनी ठराविक कंपनीच्या वाणाचा आग्रह न करता इतर वाणा बाबत माहिती घेऊन चांगले वाण खरेदी करावे, तसेच काही शंका असल्यास नजीकच्या कृषी अधिका-यांकडे संपर्क साधावा.
विक्रेत्यांनीही कंपनीकडून अथवा वितरकाकडून लिकिंगमध्ये बियाणे, खते व किटकनाशके खरेदी करु नयेत व शेतक-यांनाही लिकिंगचा आग्रह करु नये तसेच सर्व कृषी सेवा केंद्र चालक शेतकरी बंधुना त्यांच्या गरजे नुसार कृषी निविष्ठा योग्य दरात उपलब्ध करुन देतील व शेतकरी व कृषी विभागास सहकार्य करतील अशी ग्वाही संघटनेच्या वतीने देण्यात आली.


