Thursday, November 6, 2025

महायुतीला धक्का! राज्यातील राजकारणात मोठा भूकंप होणार? बडा नेता मारणार सत्तेला लाथ

महापालिकेच्या निवडणुकीत भाजपकडून स्वबळावर लढण्याबाबतची चाचपणी केली जात आहे. मुंबई, ठाणे आणि पुणे महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याबाबत चाचपणीचे आदेशच महाराष्ट्र दौऱ्यात अमित शहांनी कार्यकर्त्यांना दिल्याचं. म्हटलं जात आहे, याचदरम्यान राज्यातील राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झालीय. या भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्ली असणार असल्याचं म्हटलं जात आहे. दिल्लीत महायुतीविरोधात काही तरी हालचाल होणार असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीपासून दूर असलेले महादेव जानकर नवीन समीकरण जोडू पाहत आहे. मिळालेल्या माहितीनुसार,महादेव जानकर हे इंडिया आघाडीसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू झालीय. मी सध्या महायुती, एनडीएसोबत नाही, असे सूचक विधान जानकर यांनी केलंय. त्यामुळे जानकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारी आहेत.

राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर आता महायुतीला रामराम करणार आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर जानकर नाराज असल्याची चर्चा आहे. आता तर ते नवीन घरोबा करण्याच्या तयारीत आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने महादेव जानकरांनी दिल्लीत शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी केली.

या कार्यक्रमासाठी राहुल गांधी, शरद पवार आणि अखिलेश यादव यांना निमंत्रित करत पुढील राजकीय वाटचालीबाबत स्पष्ट संकेत दिलेत. आम्ही सध्या महायुती, एनडीएसोबत नाही. मी सध्या नवीन घरोबा करण्याच्या तयारीत आहे, असे सूचक विधानही जानकर यांनी केलंय.

राष्ट्रीय समाज पक्षाला सन्मानपूर्वक जागा दिल्या तरच आम्ही इंडिया आघाडीसोबत जाण्यास तयार आहोत. ज्या ठिकाणी विजयाची खात्री आहे, त्याच जागा मागण्याचा आमचा प्रयत्न असेल. लवकरच त्याबाबतची चर्चा सुरू होईल, असंही जानकर यावेळी म्हणालेत. दरम्यान राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील युती सरकारसोबत आहेत. मात्र आपल्याला दुर्लक्षित केल्याची भावना जानकर यांच्या मनात असून ते महायुतीला रामराम करण्याच्या तयारीत आहेत.

दरम्यान महादेव जानकर यांच्याविषयी आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिलीय. आपण कोणत्या पक्षात जाईल हे जानकारांना माहीत नसते, पण अखेर ते महायुतीतच येतील, ते स्वतःच वाटोळ करून घेणार नाहीत, असा विश्वास मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केलाय.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles