Sunday, November 2, 2025

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का ; ७ आमदारांनी साथ सोडली

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नागालँडमध्ये मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रावादी काँग्रेसच्या नागालँडमधील सात आमदारांनी अजित पवारांची साथ सोडली असून सत्ताधारी एनडीपीपीमध्ये प्रवेश केला आहे. ७ आमदारांनी एनडीपीपीमध्ये पक्षप्रवेश केल्याने मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्वाखाली एनडीपीपी पक्षाला विधानसभेमध्ये पूर्ण बहुमत मिळाले आहे. अजित पवार गटाच्या विलिनिकरणामुळे एनडीपीपीचे विधानसभेतील संख्याबळ ३२ वर पोहोचले आहे.

नागालँडच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप आलाय, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात आमदार सत्ताधारी NDPP मध्ये विलिन झाले आहेत. राष्ट्रवादीचे आमदारांनी प्रवेश केल्यामुळे NDPP च्या आमदारांची संख्या २५ वरून ३२ वर पोहोचली आहे. NDPP ला आता भाजपच्या समर्थनाची गरज भासणार नाही.

कोण कोणत्या आमदारांनी साथ सोडली –

नमरी एनचांग – टेनिंग

पिक्टो शोहे – अतोइजू

वाई. मोहोनबेमो हम्तसोए – वोखा टाउन

वाई. मनखाओ कोन्याक – मॉन टाउन

ए. पोंगशी फॉम – लॉन्गलेंग

पी. लांगोन – नोकलाक

एस. तोइहो येप्थो – सुरुहोटो

या विलीनीकरणामुळे राष्ट्रावादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे, कारण नगालँडमधील राष्ट्रावादीचे सर्व आमदार यापूर्वी त्यांच्या गटात होते. नगालँड विधानसभेत सध्या कोणताही विरोधी पक्ष नसल्याने NDPP ची सत्ता आणखी मजबूत झाली आहे. या घडामोडीमुळे नगालँडच्या राजकीय समीकरणात मोठे बदल घडण्याची शक्यता आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles