नगर शहरात म.न.पा.च्या गाड्यांवर “अहिल्याबाई होळकर” यांचे नावाचा अवमान झाल्यामुळे संताप : दोषींवर कठोर कारवाईची मागणी
अहिल्यानगर (प्रतिनिधी) – महानगर पालिकेचे जेव्हापासून पासून प्रशासक नेमले गेले त्या पासून म.न.पा.च्या चाललेल्या मनमानी कारभारामुळे आता अधिकाऱ्यांची नगर शहराशी वाट लावण्याची जणू काही स्पर्धाच लागली असल्याचे दिसते. अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यानगर करावयाच्या वादविवादात चालू असतानाच म.न.पा. आयुक्त यांनी नगर शहरातील म.न.पा. चे नाव टाकलेल्या अहिल्यानगर नावाचे फलक म.न.पा वर लावले. म.न.पा.च्या प्रत्येक वाहनावर बदलण्याचे आदेश दिले तसेच शासकीय कामकाजाला सुद्धा अहिल्याबाई होळकर यांचे नाव देऊन अहिल्यानगर हे नाव वापरण्याचे आदेश दिल्याचे समजते.
म. आयुक्त साहेबांनी नगर शहरात मोठ्या प्रमाणात स्वच्छतेसाठी मोहीम राबविली परंतु त्यांच्या नगर शहरात फिरणाऱ्या त्यांच्या वाहनांकडे त्यांचे लक्ष का गेले नाही? जे वापरले जाणारे घन कचऱ्याची वाहने आहेत त्यावर सरळ शब्दात अहिल्यानगराच्या जागी ( हेल्या नगर ) हे टाकून त्या गाड्या संपूर्ण नगर शहरात फिरताना दिसत आहेत. हे सरळ सरळ राजमाता अहिल्याबाईंचा अपमान झाल्याचे दिसून येते. तसेच त्या कार्यप्रणाली कोणाच्या गाड्यांवर नंबर प्लेट नाही व मोठ्या प्रमाणात वाहनचालकाकडे लायसन्स सुद्धा नाही तरी याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शहर विकास दक्षता मंचाचे अध्यक्ष विजय घासे म्हणाले की, “नगर शहरातील प्रशासकीय पातळीवरून चालणाऱ्या निष्काळजी व अपमानकारक कृतीमुळे अहिल्याबाई होळकर यांच्या नावाचा अवमान होत आहे. आमची मागणी हीच आहे की, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि नगर शहराचा व अहिल्याबाईंचा सन्मान राखावा असे नगर शहर दक्षता विकास मंच यांच्यावतीने मागणी करण्यात आली आहे


