आ. संग्राम जगताप यांचा चहा स्टॉलवर जनता दरबार
अहिल्यानगर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आमदार संग्राम जगताप छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी आले असता, या ठिकाणी शहरातील विविध भागातील नागरिक आपले काम घेऊन आमदार संग्राम जगताप यांच्याकडे आले होते. यावेळी जमलेल्या नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याकरता आमदार संग्राम जगताप थेट चहाच्या टपरीवर जाऊन बसले, व एक-एक नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम सुरू केले. त्या ठिकाणावरून थेट प्रश्न सोडवण्यासाठी फोन लावण्याचे काम करत, थेट जनतेत जाऊन जनतेचे प्रश्न सोडून दिल्याने नागरिकांनी देखील यावेळी समाधान व्यक्त केले.


