Wednesday, November 5, 2025

श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे यांच्या हाती धनुष्यबाण

अहिल्यानगर: श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे व त्यांचे नातू नीरज यांच्यासह समर्थक, तसेच माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे यांनी आज, शनिवारी पुन्हा धनुष्यबाण हाती घेतले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहण्याचा संकल्प करत माजी आमदार मुरकुटे आणि अशोक सहकारी साखर कारखान्याचे संचालक नीरज मुरकुटे यांनी ६५० समर्थक, तसेच माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे यांनीही आपल्या ७५ समर्थकांसह शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला.

ठाणे येथील आनंद आश्रम येथे हा पक्षप्रवेश सोहळा झाला. या वेळी माजी खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, राजेंद्र देवकर आदी उपस्थित होते. या वेळी एकनाथ शिंदे म्हणाले, की शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांनी उभारलेली चळवळ आहे. मुरकुटे समर्थकांचा प्रवेश म्हणजे पक्षाच्या विचारधारेत रुजलेल्या निष्ठावान नेतृत्वाची भर आहे. यामुळे पक्षाचे बळ श्रीरामपूर तालुक्यात अधिक घट्ट होईल.

मुरकुटे म्हणाले, मी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मानणारा आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ग्रामीण भागाचा विकास आणि सामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेनेसोबत खंबीरपणे उभे राहू.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles