Tuesday, November 4, 2025

शैनेश्वर देवस्थान ५०० कोटी रुपयांचा अपहार ,विश्वस्त मंडळाला बरखास्त करून देवस्थान वर प्रशासकाची नेमणूक करावी

भाजपाचे विशाल सुरपुरीया यानी दिले मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन.
शनिशिंगणापूरच्या देवस्थानचे विद्यमान विश्वस्त मंडळाला बरखास्त करून देवस्थान वर प्रशासकाची नेमणूक करावी- विशाल सुरपुरीया.
शैनेश्वर देवस्थानच्या नावाने खोटे व बोगस ॲपची निर्मिती करून ४०० ते ५०० कोटी रुपयांची आर्थिक लूट व अपहार झाल्याचा आरोप.
नगर (प्रतिनिधी)- श्री शैनेश्वर देवस्थान शनिशिंगणापूर ता. नेवासा जिल्हा अहिल्यानगर या देवस्थानचे विद्यमान विश्वस्त मंडळाला बरखास्त करून सदर देवस्थानावर कर्तव्यदक्ष सरकारी प्रशासकाची नेमणूक करण्याच्या मागणीसाठी भाजपच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना निवेदन देताना भाजपाचे विशाल सुरपुरीया आदी उपस्थित होते.
पुढे निवेदनात म्हटले आहे की, देवस्थानच्या नावाने खोटे व बोगस ॲपची निर्मिती करून त्याद्वारे सुमारे ४०० ते ५०० कोटी रुपयांची आर्थिक लूट व अपहार केलेला आहे. देवस्थानची व देवस्थान मधील सर्व कर्मचारी व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची सखोल चौकशी होऊन सर्वांच्या संपत्तीची चौकशी करून संबंधित ॲप निर्मितीमध्ये दोषी आढळलेल्या व्यक्तीविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करून संबंधितांना कठोर शासन करण्यात यावे व देवस्थान ने भक्तगणांसाठी ऑनलाइन ॲप सुरू करून त्याद्वारे ऑनलाईन पूजा व तेल अर्पण सर्विस चालू केली जेणेकरून भक्तांकडून डोनेशन, चढावा, पुजारी सेवा, पूजा व तेल अर्पणासाठी सुमारे रक्कम रुपये १५०० ते २ हजार रुपये ऑनलाईन आकारणी करून सदर रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर मार्फत स्वीकारून इच्छुक भक्तांची देवस्थान डोनेशन चढावा पुजारी सेवा पूजा व तेल अभिषेक केला जाईल अशी हमी देऊन सदर ॲप द्वारे इच्छुक भक्तांची रक्कम स्वीकारून सदर सर्विस पुरवली जाण्याबाबतचे आहे. ज्या मार्फत कोट्यावधीचा आर्थिक घोटाळा राजरोसपणे चालू आहे देवस्थान ने ऑनलाइन पूजा व तेल अर्पण सर्विस साठी देवस्थानने परवानगी दिलेले ऑनलाइन ॲप सुरू केलेले होते असे देवस्थानचे कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ किरुजी दरंदले यांच्या सहीचे ३० मे २०२५ रोजी च्या पत्रावरून बोध होते परंतु त्याबाबत देवस्थान मध्ये व देवस्थानातील परिसरामध्ये कधीही व कुठल्याही प्रकारे जाहिरात केलेली नव्हती अथवा त्याबाबतचे माहितीपत्रक फ्लेक्स बोर्ड बॅनर इत्यादी देवस्थान परिसरामध्ये लावण्यात आलेले नव्हते व नाही किंवा लोकांची व भोळ्या भाबड्या शनि भक्तांची आर्थिक लूट करून अमाप बेहिशोबी संपत्ती मालमत्ता कमवायच्या उद्देशाने सदर देवस्थानातील संबंधित खात्याचे विभाग प्रमुख कर्मचारी व वरिष्ठ अधिकारी वर्गाने सदरचे ॲप बोगस निर्माण करून त्याद्वारे शनि भक्तांकडून खूप मोठ्या प्रमाणात रक्कम सदर ॲप अन्वे जमा झालेल्या खात्यामधून व काही ॲपच्या सगमताने आपल्या वैयक्तिक आर्थिक हितासाठी स्वतःच्या नावे वर्ग करून खूप मोठा आर्थिक घोटाळा केलेला आहे. व अद्यापही भक्तांची लूट सुरूच आहे तसेच शनेश्वर देवस्थानचे २२ मे २०२५ रोजी दर्शन ॲप बंद केल्याचे आव्हान केले परंतु त्यामध्ये ॲप कोणत्या नावाने आहे किती अँप आहे हे जाहीर केले नाही तसेच शैनेश्वर देवस्थान ने यामागे कधीही देवस्थाने दर्शन ॲप सर्विस बाबत जाहिरात केलेली नाही त्यामुळे कधीही ॲप ची जाहिरात केली नसताना बंद केलेल्या ॲपची ताबडतोप जाहीर करण्याचे आव्हान हीच विश्वस्त मंडळाचा भूमिका संशयस्पद आहे व शनेश्वर देवस्थान मधील विश्वस्त मंडळातील अधिकारी व कर्मचारी यांची या संपूर्ण प्रकरणात चौकशी करून यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावे चौकशी होताना ज्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी विश्वस्तांनी हा घोटाळा केला तेच जर या शैनेश्वर देवस्थान विश्वस्त कमिटीवर चौकशी सुरू असताना बसलेले असतील तर घोटाळ्यातील अनेक पुरावे नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही व हे सर्व घोटाळ्याचे पुरावे शनेश्वर देवस्थान विश्वस्त कमिटी पुसून टाकून घोटाळा करणाऱ्यांना पाठीशी घातल्याशिवाय राहणार नाही. व या घोटाळ्याची चौकशी सुरू राहील व संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल होईपर्यंत आपण शैनेश्वर देवस्थान मधील कमिटी अधिकारी सर्व विश्वस्त मंडळाला स्थगिती देऊन किंवा बरखास्त करून शासन नियुक्त कर्तव्यदक्ष अधिकारी शनेश्वर देवस्थान प्रशासक म्हणून नियुक्ती करावी व ॲप घोटाळ्यातील चौकशी पारदर्शक पद्धतीने करण्याची मागणी भाजपाचे विशाल नवनीत सुरपूरीया यांनी केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles