केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात ६००० रुपये मिळतात. दरम्यान, या योजनेचा पुढचा हप्ता कधी देणार त्याची तारीख समोर आली आहे. पीएम किसान योजनेत आतापर्यंत १९ हप्ते जमा करण्यात आले आहेत. त्यानंतर आता शेतकऱ्यांना २० व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. मिडिया रिपोर्टनुसार, शेतकऱ्यांना २० जून रोजी हप्ता मिळणार आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.पीएम किसान योजनेत दर चार महिन्यांनी २००० रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा केले जातात. याचा पहिला हप्ता एप्रिल ते जुलै महिन्यासाठी असतो. त्यानंतर ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि डिसेंबर ते मार्च या तीन टप्प्यांमध्ये पैसे मिळतात.
योजनेचा लाभ कोणाला मिळतो?
पीएम किसान योजनेचा लाभ भारतातील शेतकऱ्यांना मिळतो. ज्यांच्याकडे जमी आहे. या योजनेचा लाभ घेताना बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक असावे. याचसोबत केवायसी प्रोसेस पूर्ण केलेली असावी. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
भारत देश हा कृषीप्रधान आहे. देशात कोट्यवधि लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांचे घर चालते. याच शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी सरकारने काही योजना सुरु केल्या आहेत.


