भिंगारला होणार स्वतंत्र नगरपालिका
अहिल्यानगर-कँटोन्मेट बोर्ड अर्थात कटक मंडळे लष्करी अस्थापनांकडून काढून घेऊन शेजारील स्थानिक स्वराज्य संस्थांना जोडण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार ही कटक मंडळे वेगळी करण्यात आली. आता त्यांचे काय करायचे. याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार नगर शहराशेजारील भिंगार अहिल्यानगर महापालिकेला न जोडता स्वतंत्र नगरपालिका करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विधानभवन येथे राज्यातील कटक मंडळांचे नगरपालिका, महापालिका क्षेत्रात विलिनीकरणाबाबत बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विधान परिषद सदस्य सिद्धार्थ शिरोळे, सरोज अहिरे, नगरचे संग्राम जगताप, सुनिल कांबळे आदी उपस्थित होते.
पुणे, खडकी कटकमंडळ पुणे महापालिकेमध्ये, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) कटकमंडळ छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये जोडण्यात येणार आहे. तर देवळाली (नाशिक) व अहमदनगर (भिंगार) टकमंडळ स्वतंत्र नगरपालिकामध्ये रुपांतरित करण्यात येणार आहे. या शहरांना आता जिल्हा नियोजन मंडळातूनही निधी देण्यात येणार आहे. त्यांच्या निवडणुका इतरांसोबतच घेतल्या जाणारी की नंतर घेतल्या जाणार? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
भिंगारला होणार स्वतंत्र नगरपालिका ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
- Advertisement -


