यशस्वी सापळा कारवाई*
 ▶️ युनिट – * अहिल्यानगर
▶️ तक्रारदार- पुरुष, वय 26, अहिल्यानगर
▶️ आलोसे-
 आरोपी लोकसेवक
 सतीश रखमाजी धरम, वय 40 वर्ष, धंदा नोकरी, तलाठी सजा आडगाव चार्ज तिसगाव तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर
 (वर्ग ३)
 2 अक्षय सुभाष घोरपडे वय 27 वर्ष धंदा शेती राहणार शिंगवे केशव तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर
 (खाजगी इसम) (वर्ग-3)
▶️ लाचेची मागणी-
 50000/-
▶️ लाच स्वीकारली-
 50000/-
▶️ * लाचेचे कारण*.
 यातील तक्रारदार यांनी दिनांक 31/07/2025 रोजी लेखी तक्रार दिली की, तक्रारदार यांचे वडिलांची नावे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले आहे. सदर घरकुलाचा पाया भरण्याच्या कामकाजा करता मुरूम व जाडसर वाळूच्या दोन गाड्या तक्रारदार यांनी नदीपत्रातून आणून घरकुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी खाली केलेल्या होत्या. सदर मुरूम आणण्याकरिता त्यांनी त्यांचे चुलते व मित्र यांच्या जेसीबी व ट्रॅक्टरचा वापर केलेला होता. यातील आलोसे तलाठी धरम व नायब तहसीलदार सानप तहसील पाथर्डी यांनी रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी येऊन पाहणी केली होती त्यानंतर आलोसे सतीश धरम तलाठी यांनी तक्रारदार यांना म्हटले आहे की तुम्ही गौण खनिजाची अवैद्य वाहतूक केलेली आहे तुमच्या वाहनावर व तुमच्यावर कारवाई होऊ द्यायची नसेल तर नायब तहसीलदार यांना पन्नास हजार रुपये द्यावे लागतील असे म्हणून आलोसे तलाठी धरम याने तक्रारदार यांच्या वाहनावर व मुरुमांच्या ढिगावर अवैद्य गौण खनिज वाहतुकीचे कारवाई न करण्याच्या मोबदल्यात 50000 रुपये लाचेची मागणी केलेली आहे सदरची लाच रक्कम तक्रारदार यांच्याकडून आलोसे धरम यांनी स्वतः स्वीकारून ती लाच रक्कम खाजगी इसम घोरपडे यांच्याकडे दिलेली आहे.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
▶️ आलोसे यांना ताब्यात घेण्यात आले असून पाथर्डी पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
 ▶️ सक्षम अधिकारी
 माननीय जिल्हाधिकारी अहिल्यानगर
▶️ सापाळा व तपास अधिकारी
 श्री. अजित त्रिपुटे,
 पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर
 मो.नं. 8329701344
▶️ सापळा पथक :-
 पोलीस कॉन्स्टेबल रवी निमसे पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब कराड, चालक पोलीस हवालदार हारून शेख, सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर
▶️ *मार्गदर्शक-
 1) मा. भारत तांगडे, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
 मो. क्र.8888832146.*
2) मा. माधव रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक,
 ला.प्र.वि,नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
 मो.क्र.9922266048
▶️ आलोसे यांचे सक्षम अधिकारी
 मा जिल्हाधिकारी अहिल्यानगर


