Thursday, October 30, 2025

अहिल्यानगर शहरातील कार्यकर्त्यांचा आंबेडकर यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन सेनेत प्रवेश

रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत अहिल्यानगर शहरातील कार्यकर्त्यांचा रिपब्लिकन सेनेत प्रवेश.
नगर (प्रतिनिधी)- मुंबई येथील आंबेडकर भवन येथे झालेल्या बैठकीत ईदूमिल आंदोलनाचे प्रणेते व रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत व अहिल्यानगर शहराचे फुले, शाहू, आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाने अहिल्यानगर शहरातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष महेश भोसले, ऑल इंडिया पॅंथर सेनेचे माजी शहराध्यक्ष अतुल भिंगारदिवे, सामाजिक कार्यकर्ते विकास रणदिवे, भारिपचे पदाधिकारी बाळासाहेब कसबे, गणेश प्रहार, रवींद्र अरुणकर, महिला सुनीता शिंदे, बेबीताई टकले, स्नेहा जावळे, स्वप्नील पवार, विनोद काळे आदीसह कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेनेत पक्षप्रवेश केला यावेळी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे आंबेडकर यांनी स्वागत करून त्यांना मार्गदर्शन केले यावेळी राज्य सचिव विनोद काळे, मुंबई अध्यक्ष प्रकाश खंडागळे आदी उपस्थित होते.
तसेच येणाऱ्या ५ एप्रिल रोजी बिहार येथील महाबोधी महा बुद्ध विहार वाचवण्यासाठी शनिवार दि. ५ एप्रिल रोजी भायखळा राणी बाग ते आझाद मैदानावर पायी महामोर्चा होणार आहे यामध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाचे नेते सुनील शिंदे यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles