सामाजिक कार्यकर्त्या विद्या गाडेकर यांचे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन.
शेवगाव शहरात परवानगी घेऊन लावण्यात आलेले राम नवमीचे बॅनर (फलक) हटवल्याने शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी.
नगर (प्रतिनिधी)- शेवगाव शहरात रामनवमी निमित्ताने सामाजिक बांधिलकीतून सामाजिक कार्यकर्त्या विद्या भाऊसाहेब गाडेकर यांनी प्रभू श्रीराम यांचे लावण्यात आलेले बॅनर फलक कुठलीही पूर्वसूचना न देता काढल्याने शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी यांच्यावर तातडीने कारवाई करण्याच्या मागणीसाठी पोलीस अधीक्षक व निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निवेदन देताना सामाजिक कार्यकर्त्या विद्या भाऊसाहेब गाडेकर आदी उपस्थित होते.
पुढे निवेदनात म्हटले आहे की, सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील शेवगाव शहरात श्रीराम राम मंदिर देवस्थान ट्रस्ट मोठ्या उत्साहात प्रभू रामचंद्र यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. आम्ही देखील सामाजिक बांधिलकी आणि एक हिंदू म्हणून त्याच ठिकाणी शेवगाव नगर परिषदेची पूर्व परवानगी घेऊन प्रभू श्रीराम यांच्या उत्सवचे शुभेच्छा पर बॅनर फलक लावले होते विशेष म्हणजे या फलकावर कुठल्याही पक्षाचे चिन्ह लावले नाही कारण प्रभू श्रीराम कुठल्या पक्षाचे नसून कुठल्या धर्मापुरते ते मर्यादित देखील नाही ते अखंड हिंदुस्तान व विश्वाचे आराध्य दैवत आहे तरी असे असतानाही राजकीय दृशपोटी आपल्या शेवगाव शहरातील पोलीस निरीक्षक समाधान नांगरे व नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांनी कुठलीही पूर्व सूचना न देता लावलेले फलक काल रात्री हटवले हा एक राजकीय षडयंत्र असल्याने व राजकीय दृश्यापोटी काही निवडक व्यक्तींचे शेवगाव पाथर्डी नगर परिषद ऐकते का व कोणाची मक्तेदारी आहे असा सवाल करण्यात आला व फलक कोणाच्या सांगण्यावरून हटवले व का हटवले याची तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शेवगाव शहरात परवानगी घेऊन लावण्यात आलेले राम नवमीचे बॅनर हटवल्याने पोलीस निरीक्षक मुख्य अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी
- Advertisement -


