Thursday, October 30, 2025

वंचित बहुजन युवा आघाडीच्या शहराध्यक्षपदी यांची नियुक्ती युवा आघाडीची नूतन कार्यकारिणी जाहीर

वंचित बहुजन युवा आघाडीच्या शहराध्यक्षपदी ॲड. योगेश गुंजाळ यांची नियुक्ती
युवा आघाडीची नूतन कार्यकारिणी जाहीर
नगर (प्रतिनिधी)- वंचित बहुजन युवा आघाडीच्या शहराध्यक्षपदी ॲड. योगेश भगवानराव गुंजाळ यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचप्रमाणे महासचिव पदी इंजि. रोहन परदेशी यांची नियुक्ती करुन नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
वंचित युवा आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष निलेश विश्‍वकर्मा यांनी अहिल्यानगर शहरातील युवा आघाडीची कार्यकारणी जाहीर केली आहे. उपाध्यक्षपदी ऋतिक शिंदे, नबी अब्दुल सत्तार शेख, रोहिदास डोकडे, संघटकपदी अजित कदम, सहसंघटकपदी सुनिल दामले, सचिवपदी ईश्‍वर कांबळे, सहसचिवपदी अजय भोसले, सदस्यपदी बाळू शिंदे व सुनिल फुलारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ॲड. योगेश गुंजाळ गेल्या पंधरा-वीस वर्षापासून भटक्या विमुक्त समूहात काम करत आहेत. त्यांनी उपेक्षित घटकांच्या न्याय, हक्कासाठी अनेक आंदोलन, मोर्चे, उपोषण केले आहे. अनेक आंदोलन करून विविध प्रश्‍न मार्गी लावलेले आहेत. भारतीय टायगर फोर्स संघटनेचे शहराध्यक्ष ते जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळून अनेक सामाजिक कामे केले आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या स्थापनेपासून ते पक्षात सक्रीयपणे काम करत आहे. आत्तापर्यंत त्यांनी कोणतेही जबाबदारी घेतली नव्हती, पक्षाच्या वतीने त्यांचे सामाजिक कार्य पाहून त्यांच्यावरती युवकांना संघटित करण्यासाठी युवक आघाडीच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, राज्य प्रवक्ते अरुण जाधव, जिल्हाध्यक्ष योगेश साठे, शहराध्यक्ष हनीफ शेख यांनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles