Sunday, November 2, 2025

शासकीय योजनांचे आमिष दाखवत शिर्डीत २८ लाखांची फसवणूक ; गुन्हा दाखल

शिर्डीमध्ये साई वैभव बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून शासनाचा निधी मिळवून व शासकीय कामे करून नफा मिळवू, असा विश्वास संपादन करून २८ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून शिर्डी पोलिसांनी किरण शेजवळ (शिर्डी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. किरण शेजवळला अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी दिली. शिर्डीतील ग्रो मोअर कंपनीने गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण ताजे असतानाच विविध शासकीय योजनांचा फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक केल्याचा आणखी एक प्रकार शिर्डीत उघडकीस आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण शेजवळ याने सन २०२० ते ३० जुलै २०२५ या कालावधीत ओळखीचा फायदा घेऊन आपण बहुउद्देशीय संस्था उभारून त्याद्वारे विविध शासकीय योजना मिळवून देतो, अशी तोतयागिरी करीत लोकांची आर्थिक फसवणूक केली आहे. कोपरगाव, संगमनेर, राहाता या भागातील लोकांना गाडी, शेत जमिनीचे आमिष दाखवत गुंतवणूक करण्यास भाग पाडले. नंतर त्याच्याकडून रक्कम मिळत नाही, अशी खात्री पटल्याने ५ गुंतवणूकदारांनी साई वैभव बहुउद्देशीय संस्थेचा संचालक शेजवळविरुद्ध शिर्डी पोलिसांकडे फिर्याद दिली.शिर्डीत एका वर्षात रक्कम दुप्पट करण्याच्या आमिषाने बळी पडलेल्या ग्रोमोरच्या आर्थिक गैरव्यवहारात धक्कादायक खुलासे बाहेर येत असून ग्रोमोर चा म्होरक्या भूपेंद्र राजाराम सावळे याच्यासह इतरांच्या नावावर असलेल्या ११ बँक खात्यांमध्ये तब्बल ८६५ कोटी रूपयांपेक्षा अधिक रकमेचे व्यवहार झाल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

भूपेंद्र सावळेने पैसा गोळा करण्यासाठी उभारलेल्या ग्रोमोर इन्व्हेसमेंट फायनान्स, ग्रोमोर फिनकेअर सर्व्हिसेस, ग्रोमोर इन्व्हेस्टमेंट आणि ग्रोमोर स्वराज्य कॅपिटल या फसवणूकीच्या केंद्रामध्ये शेकडो गुंतवणूकदारांकडून तब्बल ५५३ एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कमा जमा करणारा भूपेंद्र एकटा आरोपी नाही इतरही अनेक जण यात गुंतलेले आहेत.

पोलिसांनी फक्त त्याच्या मालमत्तेची चौकशी करत असताना शिर्डीतील आलिशान घर, महागड्या गाड्या, सोने, तसेच प्लॉट खरेदी केल्याचे दिसून येत आहे. त्याने कुठे कुठे चल अचल मालमता खरेदी केली याची पोलीसांकडून झाडाझडती सुरू आहे पोलिसांकडून जप्तीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. ग्रोमोर घोटाळ्यातील मुख्य आरोपी भुपेंद्र साबळे यास अटक करण्यात आली आहे. त्याच्या इतर सहा आरोपींसह इतर संशयित आरोपींचा शोध सुरू आहे.

सुमारे १३ जणांच्या नावे एकूण ९ कोटी ६४ लाख २८ हजार ६९४ रूपयांचे अनाधिकृत देवाण घेवाण व्यवहार झाले आहेत. या रकमा नेमक्या कोणत्या हेतूने आणि कोणाच्या खात्यात बळवण्यात आल्या त्यांचा आणि भूपेंद्रचा नेमका काय संबंध याचा तपास अहिल्या नगर येथील आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles