शहरातील विविध भागातील चोरीचा तपास लावणाऱ्या पोलीस प्रशासन व अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार संपन्न
नगर शहरात व्यापाऱ्यांमध्ये पोलिसांविषयी कारवाईतून एक आश्वासक वातावरण निर्माण – आ. संग्राम जगताप
अहिल्यानगर शहरातील चितळे रोड, कापड बाजार, सर्जेपुरा भागात चोरट्यांनी धुमाकूळ घालत दुकाने फोडून लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला होता ३ ऑगस्ट रोजी मध्यरात्री चोरीचा प्रकार घडला होता. आणि चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. एका रात्रीत शहरातील विविध भागात दुकानात चोऱ्या झाल्यामुळे पोलिसांसमोरही चोरट्यांचे एक मोठे आव्हान निर्माण झाले होते. याबाबत नगर शहराचे आमदार संग्राम जगताप आणि व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन चोरीचा तपास लवकरात लवकर लागावा अशी मागणी केली होती. तसेच जर पोलीस तपास लागला नाही तर नगर शहरातील व्यापाऱ्यांना घेऊन आंदोलन करण्याचा इशाराही आमदार संग्राम जगताप यांनी दिला होता. मात्र घटनेनंतर 24 तासाच्या आतच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर शहरात झालेल्या चोऱ्यांचा छडा लावून सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या ३ आरोपींना पुणे विमानतळावरून अटक केली आणि चोरीचा तपास लावला. आमदार संग्राम जगताप यांनी दिलेल्या इशारानंतर 24 तासाच्या आत पोलिसांनी चोरट्यांना जेरबंद केल्याने आमदार संग्राम जगताप यांच्यासह व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, शहर उपाधीक्षक अमोल भारती आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्यासह चोरीचा तपास लावणाऱ्या पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
एका रात्रीत अनेक ठिकाणी दुकानांमध्ये चोरी झाल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे पोलिसांनी हे आव्हान स्वीकारून चोरी करणाऱ्या चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळे नगर शहरात व्यापाऱ्यांमध्ये कारवाईतून पोलिसांविषयी एक आश्वासक वातावरण निर्माण झाले असून.ज्याप्रमाणे चूक झाल्यावर पोलिसांवर टीका करण्यात येते त्याप्रमाणे त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक करणे ही समाजाचे काम आहे. असे वक्तव्य यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सत्कार यावेळी केले.
यावेळी ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड, सुरेश बनसोडे, एडवोकेट राजेश कातोरे, बाली बांगरे, दीपक नवलानी, डी चंद्रकांत आदी उपस्थित होते.


