Saturday, November 1, 2025

खळबळजनक…… प्रांजल खेवलकरांच्या मोबाईलमध्ये 234 अश्लील फोटो अन् व्हिडिओ, मोलकरणीचाही व्हिडिओ

एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. रेव्ह पार्टी प्रकरणात महिला आयोगानेही उडी घेतली आहे. महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणात खळबळजनक माहिती दिली आहे. प्रांजल खेवलकरांच्या मोबाईलमध्ये अश्लील 234 फोटो आणि व्हिडिओ आहेत. त्यांच्या मोबाईलमध्ये मोलकरणीचाही व्हिडिओ आहे, अशी खळबळजनक माहिती रुपाली चाकणकर यांनी माहिती दिली.

प्रांजल खेवलकर प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत हादरवणारी माहिती दिली. ‘आयोगाला अहवाल मिळाला आहे. पुणे पोलिस आयुक्तांचा अहवाल आयोगाला प्राप्त झाला. 7 आरोपींना ताब्यात घेऊन मुद्देमाल अंमली पदार्थ जप्त केले. प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये असलेले काही व्हिडिओ मिळाले. यातील चॅटिंग आणि व्हिडिओ माध्यमातून समोर आलेल्या गोष्टी, काही शब्द यात उल्लेख करता येत नाहीत असे आहेत. मोबाईल व्हिडिओ फोल्डरमध्ये 252 व्हिडिओ सापडले’.

‘मोबाईलमध्ये 1497 फोटो आहेत. त्यात मुलींचे अश्लील फोटो व्हिडिओ आहेत. त्यात मुलींचे 234 अश्लील फोटो आणि व्हिडिओ आहेत, अशी माहिती त्यांनी पुढे दिली.

‘मुलींना अंमली पदार्थ देऊन लैंगिक अत्याचार करून व्हिडिओ काढलेले आहेत. या व्हिडिओचा वापर करून मुलींना परत ब्लॅकमेल करण्यासाठी वापरण्यात आले आहेत. घरात साफसफाई करणाऱ्या मोलकरणीचा व्हिडिओ आणि फोटो वाईट अवस्थेतील आहेत. सिनेमात काम देणे आणि इतर प्रलोभन दाखवून मुलींना बोलवले जात होते, असंही चाकणकर यांनी सांगितले.

‘या प्रकरणात मानवी तस्करी विरोधी पथक काम करत आहे. या प्रकरणात मुलींचं मोठ्या प्रमाणात लैंगिक शोषण करण्यात आलेलं आहे. राज्य महिला आयोगाच्या वतीने महिलांच्या अनैतिक मानवी तस्करीच्या विरोधात एसआयटी स्थापन करण्याबाबत पत्र दिलं आहे. पुण्यातील पार्टीत महिलांचा अश्लील वापर करण्यात आलाय, असेही ते म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles