Thursday, October 30, 2025

जावई खेवलकरांच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ फोल्डर, चाकणकरांच्या आरोपांनंतर एकनाथ खडसेंचा पारा चढला

पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी धक्कादायक दावा केलाय. याप्रकरणात अटकेत असलेले प्रांजल खेवलकर यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केलेत. रुपाली चाकणकर यांनी जावई यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर सासरे एकनाथ खडसे संतापले आहेत. रुपाली चाकणकर या चेकाळल्या आहेत. रोहिणी खडसे आणि माझं तोंड दाबण्याचे प्रयत्न सरकारकडून होत असल्याचा आरोप खडसे यांनी केलाय.

पुण्यातील खराडी येथे सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकाला होता. या प्रकरणात माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात आता महिला आयोगाची एन्ट्री झाली. या प्रकरणाचा महिलांची तस्करीच्या दृष्टीनेही तपास करावा, असे महिला आयोगानं म्हटले होते.

दरम्यान आज पुणे पोलीस आयुक्तांनी महिला आयोगाला अहवाल पाठवल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यावर गंभीर आरोप केलेत. खेवलकरांच्या मोबाईलमध्ये महिलांचे आक्षेपार्ह फोटो आहेत, असा आरोप चाकणकर यांनी केलाय. चाकणकर यांच्या या आरोपानंतर आता एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिलीय.

रुपाली चाकणकर या चक्रावल्या आहेत. दोन महिन्यांपासून सरकारवर आम्ही हल्ला करतोय. त्यामुळेच रोहिणी खडसे आणि माझं तोंड दाबण्याचे उद्योग सरकारचे चालू आहेत. माझ्या जावयाने जर असं केलं असेल तर मला लाज वाटेल. तो दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. तो जर दोषी असेल तर त्याला फाशी देखील झाली तरी मी त्याच्या समर्थन काही करणार नाही, असा नालायक प्रकार करणारा जावई मला नकोय.

पण रुपाली चाकणकर यांना हे सगळं सांगण्याचा अधिकार कोणी दिला? रुपाली चाकणकर तुम्ही तपास अधिकारी कधी झाल्या? मानवी तस्करीमध्ये नाशिकचं हानी ट्रॅप प्रकरण येत नाही का? मंत्री हानी ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत. त्याच्यावर तुम्ही बोलत नाहीत का? असा सवाल यावेळी खडसे यांनी केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles