Friday, October 31, 2025

नगर एमआयडीसी मध्ये दमदाटी व धमक्यांचा प्रकार पैशांची मागणी ,खंडणीसह गंभीर गुन्हा दाखल

आकाश दंडवतेवर खंडणीसह गंभीर गुन्हा दाखल
एमआयडीसी मध्ये कच्चा माल पुरवठादारांकडून पैशांची मागणी
एक्साइड कंपनीच्या गेटवर दमदाटी व धमक्यांचा प्रकार
नगर (प्रतिनिधी)- एमआयडीसीमधील एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या गेटवर कच्चा माल पुरवठा करणाऱ्या वाहन चालकांना दमदाटी करून पैशांची मागणी करणाऱ्या आकाश बबन दंडवते (रा. सावेडी) याच्यासह इतर तीन अनोळखी व्यक्तींविरोधात खंडणीचा गुन्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणी कंपनीचे एचआर प्रमुख निरंजन नंदकुमार कुलकर्णी यांनी तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी भारतीय दंडविधानातील खंडणी, धमकी, गैरकायदेशीर अडथळा इत्यादी गंभीर कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.
बुधवारी (दि. 6 ऑगस्ट) रोजी पुण्यातून पाठवलेले चार टेम्पो कच्चा माल घेऊन एक्साइड कंपनीच्या गेट क्रमांक 3 वर पोहोचले होते. यावेळी आकाश दंडवते व त्याचे तीन साथीदार गेटवर आले आणि त्यांनी टेम्पो चालकांना आत सोडण्यास अडथळा निर्माण करत पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास गाडी जाळून टाकू, मारहाण करू अशा धमक्या देण्यात आल्या. कंपनीचे सिक्युरिटी सुपरवायझर विनायक काकडे यांनी हस्तक्षेप केल्यावर त्यांनाही दमदाटी करण्यात आली. वाहन चालकांनी यानंतर गेट नंबर 1 द्वारे कंपनीत प्रवेश करत माल उतरवला.
गुरुवारी (दि.7 ऑगस्ट) सकाळी नाशिकहून आलेल्या कच्चा मालाची पिकअप गाडी कंपनीच्या 3 नंबर गेटवर पोहोचताच, दंडवते व त्याच्या साथीदारांनी पुन्हा एकदा गाडी अडवून पैशांची मागणी केली. चालक संतोष विठ्ठल ठाकरे यांना धमकी देण्यात आली की गाडी आत घेतली, तर ती जाळून टाकली जाईल. चालक भीतीपोटी गाडी नाशिककडे परत घेऊन निघाला. मात्र, दंडवते व त्याच्या टोळीने चारचाकी वाहनाने पाठलाग सुरू केला. चालकाने कंपनीला फोन करून माहिती दिल्यानंतर गाडी देहरे गावाजवळ सापडली व ती कंपनीत आणून कच्चा माल उतरवण्यात आला.
एक्साइड इंडस्ट्रीजच्या पुरवठादारांकडून कंपनीला ईमेलद्वारे वारंवार धमकी आणि अडथळ्यांची माहिती दिली गेल्यानंतर कंपनीने तातडीने पोलिस ठाण्यात धाव घेतली. आकाश बबन दंडवते व इतर तीन अनोळखी आरोपींविरुद्ध खंडणी, धमकी, अडथळा, गैरकायदेशीर कृत्यांसह इतर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles