Friday, October 31, 2025

श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी माधव जगताप बिनविरोध निवड

घारगाव सेवा सोसायटी च्या चेअरमन पदी माधव जगताप बिनविरोध निवड..
श्री गों दा तालुक्यातील नावाजलेली व बागायत भागातील जवळपास तीस कोटी रुपये कर्ज वाटप असणारी अत्यंत चांगली कर्ज वसुली असणारी सेवा संस्था म्हणून गणला जाते. साधारण पणे तीन वर्षांपूर्वी गावचे सुपुत्र आणि महाराष्ट्र राज्य पणन महामंडळाचे अध्यक्ष व माजी सभापती दत्ताभाऊ पानसरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध संचालक मंडळ निवडण्यात आलं .यानंतर गावच्या सर्वांना विश्वासात घेऊन वेळो वेळी सर्वांना संधी देण्यासाठी पदाधिकारी रोटेशन पध्दतीने निवडण्यात आले.त्याचाच भाग म्हणून आज हनुमान विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन पदाच्या निवडी बाबत बैठक संस्थेच्या कार्यालयात बोलावण्यात आली होती.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुटकुळे साहेब यांनी कामकाज पाहिले. त्यांना सचिव निलेश पवार भाऊसाहेब यांनी मदत केली
या निवडणुकीत या निवडणुकीत चेअरमन पदासाठी माधव मानसिंगराव जगताप यांचा एकमेव अर्ज आला या अर्जाला सूचक म्हणून सुरेश बांदल तर म्हणून राधाताई पानसरे यांनी अनुमोदन दिले. सर्व संचालक यांनी सर्वानुमते बिनविरोध पणे माधव (मुन्ना) जगताप यांची निवड केली.याबद्दल अध्यक्ष दत्तात्रय पानसरे साहेब, नागवडे कारखान्याचे संचालक शरदबापू जगताप, शिक्षक बॅंकेचे मा चेअरमन अविनाश निंभोरे, जेष्ठ नेते गोपाळराव बांदल,पंचायत समितीचे मा सदस्य रघुनाथ खामकर,बापू माऊली ठोकळ,मा सरपंच बापूसाहेब निंभोरे मेजर,शरद खोमणे,कानिफनाथ खोमणे,नारायण खामकर,अनिल मोळक,रमेश कळमकर,दादा थिटे, विजय पाटोळे यांचे सह सर्वांनी अभिनंदन केले.माधव जगताप यांना चेअरमन पदाची संधी मिळाल्याबद्दल सर्वत्र फटाक्यांची आतिषबाजी करून तरूण वर्गाने जल्लोषात या निवडीचे स्वागत केले .विशेषतः जगताप (खोमणे )मळा परिसरातील युवक यांनी सर्व गावातील प्रमुखांचे आभार मानत जोरदारपणे युवकांची फळी भविष्यकाळात नक्कीच गावाचे विकासासाठी साथ देण्याला तयार राहील अशी ग्वाही दिली.नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांनी नूतन चेअरमन माधव जगताप यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या

निवडणुकांच्या माध्यमातून होणारे आर्थिक नुकसान व एकमेकांचे मन दुखवण्याच्या ऐवजी सर्वांना सोबत घेऊन काम करताना चांगला आदर्श गाव उभा करण्याचा प्रामाणिक प्रयत्नाचा भाग म्हणूनच आज माधव जगताप यांना संधी दिली असल्याचे पानसरे साहेब यांनी सांगितले .भविष्यकाळातही गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सर्वांना एकत्र घेऊन प्रयत्न करणार-
श्री दत्तात्रय पानसरे साहेब
अध्यक्ष, पणन महासंघ महाराष्ट्र राज्य

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles