Friday, October 31, 2025

सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या ; सहकार विभागानं घेतला मोठा निर्णय

सहकारी संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील मोठी बातमी समोर आली आहे. या निवडणुकांबाबत सहकार विभागानं मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. राज्यातील पूर परिस्थितीमुळं सहकार विभागानं हा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबरपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदीनाले दुथडी भरुन वाहत आहेत काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेती पिकांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. अवेक ठिकाणी वाहतुकीवरक परिणाम झाला आहे.तसेच वीजपुरवठा देखील खंडीत करण्यात आला आहे. या स्थितीच्या पार्श्वभूमीवर सहकार विभागानं सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारकडून निवेदन जारी
राज्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणानं एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. यात निवडणूक प्राधिकरणाने म्हटले की, ‘राज्यातील अनेक जिल्ह्यांतील पावसाची सद्यस्थिती विचारात घेऊनं ज्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेतील चिन्ह वाटपाचा टप्पा पूर्ण झाला आहे अशा संस्था, निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पहिली पदाधिकारी निवडणूक प्रक्रिया प्रलंबित आहे अशा संस्था, तसेच ज्या प्रकरणी संस्थेची निवडणूक घेण्याबाबत मा. उच्च न्यायालय/मा. खर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत अशा संस्था वगळून महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम 2014 मधील नियम 4 मध्ये नमुद केलेल्या ‘अ’ व ‘ब’ वर्गातील सहकारी संस्थांची निवडणूक 30 सप्टेंबर, 2025 पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानुसार आता या निवडणुका 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहे. आता या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. राज्यातील पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles