Thursday, October 30, 2025

राज्यात सगळ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

राज्यात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस चालू आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतातील पिके नष्ट झाली आहेत. मुसळधार पावसामुळे शेतातील बांध फुटून पिके वाहून गेली आहेत. पिके नष्ट झाल्यानंतर शेतकरी मेटाकुटीला आलाय. सरकारनं त्वरीत आर्थिक मदतीची घोषणा करावी, अशी मागणी केली जातेय दरम्यान मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिलाय. सर्व शेतकऱ्यांना मदत केली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात पत्रकारांशी बोलतना म्हणालेत. मुसळधार पावसाने थैमान घालत शेतातील पिके उद्धवस्त झाली होती. मोठ्या मेहनतीने उभी केलेली पिके अशी नष्ट झालेली पाहून शेतकऱ्यांच्या अश्रूंना बांध फुटलाय. आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पुसण्याचा प्रयत्न केलाय.

पावसामुळे 14 लाख एकर जमीन वरील पीक नष्ट झाले आहे. पण चार दिवसांत मदत दिली जात नाही. मदत सर्व शेतकऱ्यांना दिले जाईल, पंचनामे करून त्यांना मदत केली जाईल,असे मुख्यमंत्री म्हणालेत. अनेक जिल्ह्यातील नद्यांना पूर आलाय.राज्यातील परिस्थती नियंत्रणात आलीय. मात्र अजून काही भागात पाऊस अजून चालू आहे.

आजही काही ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आलाय. एनडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापनकाकडून काळजी घेतली जात आहे. राही नद्या आहेत,त्या धोक्याची पातळी ओलांडत आहेत. त्यामुळे नदी किनाऱ्यावरील गावांना इशारा देण्यात येत आहे, त्यांचे स्थलांतर केले जात आहे.तसेच त्याबाबत वेगवेगळ्या राज्याशी चर्चा केली जात आहे. तेही त्यांच्या राज्यातील धरणातील विसर्ग वाढवत आहेत.

पुण्यात पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ठाकरे बंधुंच्या बेस्ट पतपेढीच्या निवडणूकीतील पराभवाबाबत प्रश्न केला होता. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, अशाप्रकारच्या पतपेढीच्या निवडणुकीचे राजकीयकरण करु नये. मात्र ठाकरे बंधुंनी त्याचं राजकारण केलं.

शशांक राव आणि प्रसाद लाड हे आमचे नेते आहेत, मात्र आम्ही राजकीयकरण केलं नाही, असे फडणवीस म्हणालेत. दोन ठाकरे बंधू एकत्र आलेत. आता ठाकरे ब्रँण्ड निवडून येणार असं त्यांनी राजकीयकरण केलं. पण हे राजकीयकरण लोकांना आवडलेलं दिसत नाहीये, असेही मुख्यमंत्री म्हणालेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles