Wednesday, October 29, 2025

‘ठाकरे ब्रँड’चा धुव्वा, राज ठाकरे नव्हे, टार्गेटवर फक्त उद्धव ठाकरे; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोघे एकत्र आल्यामुळे यंदाची बेस्ट पतपेढीची निवडणूक चर्चेचा विषय ठरली होती.सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिकेच्या बेस्ट पतपेढीचा निकाल समोर आला. या निवडणुकीत ‘ठाकरे ब्रँड’चा पुरता धुव्वा उडाला. 21 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ठाकरेंचे सर्व उमेदवार पराभूत झाले. शशांक राव यांच्या पॅनेलचे सर्वाधिक 14 उमेदवार विजयी झाले.महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनलचे 7 उमेदवार ही निवडणूक जिंकले. या निवडणुकीच्या निमित्तानं पहिल्यांदाच उद्धव आणि राज ठाकरे यांचे पक्ष एकत्र आले होते.’ठाकरे ब्रँड’ म्हणून निवडणुकीत प्रचंड गाजावाजा झाला. मात्र आज पहाटे निकाल लागला आणि ठाकरेंना भोपळाही फोडता आला नाही.बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा पराभव झाल्यानंतर भाजपकडून ठाकरे गटाला डिवचण्यात आले आहे.दादरच्या सेनाभवन परिसरात भाजपची जोरदार बॅनरबाजी पाहायला मिळत आहे.ठाकरे ब्रँड कोमात तर स्वदेशी देवाभाऊ जोमात, असे म्हणत भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले.विशेष म्हणजे भाजपने हा बॅनरद्वारे फक्त उद्धव ठाकरेंना डिवचल्याचे दिसून येत आहे.या बॅनरवर राज ठाकरेंचा फोटो लावण्यात आलेला नाही.

अशा निवडणुकांचं राजकारण करण्यात येऊ नये. ही पतपेढीची निवडणूक आहे. त्यात काही मोठं नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच या निवडणुकीत ठाकरे बंधूंनी राजकारण केलं. त्यांच्या राजकारणाला जनतेनं उत्तर दिलंय. या साध्या निवडणुकीतही जनतेनं त्यांना नाकारलं आहे. मतदारांनी ठाकरे ब्रँड नाकारला, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली. शशांक राव आणि प्रसाद लाड देखील आमचेच आहेत, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

पैशाचा वापर निश्चित झाला. पराभव झाला हे आरोप केले तरी टिका केली जाते. पैशांचा वापर झाला हे मी निवडणूकीपूर्वीच पुराव्यानिशी दाखवलं, असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले. तसेच ईओडब्ल्यूच्या नोटीसा आल्या. आता 15 लाखांत घर कशी देणार हे आम्ही बघतोय. जिंकल्यावर काही हळद्या हळकुंटाने पिवळी होणारी माणसं असतात. येवढी ताकद लावून 7 आले त्याचं आत्मपरीक्षण करायला हवं. पतपेढीच्या निवडणूकीवरून लिटमस्ट टे बोलू नये तर्क लावू नये. युद्ध अजून संपलेलं नाही, असंही संदीप देशपांडे म्हणाले. प्रसाद लाडांना एवढचं त्याच्या गुरूचं वाक्य सांगेन. मेरा पाणी उतरता देख किनारे पे घर मत बसा लेना समंदर हू लोटकर वापर आऊंगा. प्रसाद लाड यांना वेळ आलं की कळेल. राव यांना अप्रत्यक्ष मदत झाली असेलते स्वत: तसं म्हणत आहेत. मुंबई बॅकेची निवडणूक आणि नगरपालिकेची निवडणूक ही सारखी नसते. मनसेने पहिल्यांदा पतपेढीची निवडणूक लढवली. आम्ही चांगली फाईट दिली, असं मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles