अहिल्यानग-आगामी काळात होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री अजित पवार गट सज्ज झाला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री पवार व प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर जिल्ह्यात व शहरात या निवडणूका लढणार आहोत. राष्ट्रवादी राज्यातील महायुतीचा घटक पक्ष असल्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिका निवडणुका महायुतीतच लढणार आहोत. जागावाटपासाठी घटक पक्षांशी चर्चा करणार आहोत. जिल्ह्यात महायुतीच व्हावी, अशी आमची इच्छा आहे.
मात्र, ज्याठिकाणी राष्ट्रवादीची ताकद आहे, त्या जागांवर आम्ही प्रबळ दावा करणार असून जर सन्मानाने जागा मिळाल्या नाहीतर प्रसंगी स्व बळावर लढत करण्यासही पक्षाची तयारी आहे. आगामी काळात काळात होणार्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकांच्या नियोजनासाठी आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री पवार यांच्या श्रीगोंदा दौर्याचे नियोजन करण्यासाठी राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण बैठक गुरूवारी शासकीय विश्रामगृह येथे झाली. जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांनी उपस्थितीत पदाधिकार्यांना मार्गदर्शन केले. या बैठकीस आ. संग्राम जगताप, आ. काशिनाथ दाते, माजी आमदार चंद्रशेखर घुले व राहुल जगताप, पणन महामंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, श्रीगोंदा साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, राहुरी साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे, माजी जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, अण्णासाहेब शेलार, जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, युवक अध्यक्ष संतोष धुमाळ, महिला अध्यक्षा अशा निंबाळकर, अजित कदम त्यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, चिटणीस, सर्व तालुकाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
 यावेळी सावंत पुढे म्हणाले, राष्ट्रवादी पक्षाच्या सभासद नोंदणीस जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील दुसर्या नंबरची नोंदणी जिल्ह्यातील दक्षिण भागात होणार आहे. दक्षिण भागातील नगर शहर व सर्व तालुक्यांमध्ये पक्षाची मजबूत बांधणी झाली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिका निवडणुकांच्या जंगी तयारीसाठी 1 सप्टेंबरपासून नगर शहरासह दक्षिण भागातील आठही तालुक्यांमध्ये मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढली असून आगामी काळात होणार्या सर्व निवडणुकांमध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नगर जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष राहील. महानगरपालिकेसह जिल्हा परिषद व पंचायत समितीवरही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच झेंडा फडकेल, असा विश्वास मला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार 29 ऑगस्टला श्रीगोंदा तालुका दौर्यावर येत आहेत. त्यांच्या दौर्याचे व होणार्या मेळाव्याचे नियोजन या बैठकीत झाले आहे. या मेळाव्यात पक्षाचे मोठे शक्तिप्रदर्शन होणार असून 20 ते 25 हजार कार्यकते उपस्थित रहाणार आहोत, असेही सावंत यांनी सांगितले. जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा सचिव सचिन डेरे, कार्यालयीन सचिव साईनाथ भगत यांच्यासह सर्व तालुक्यांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


