श्रीगोंदा ते पेडगाव जाणार्या रोडवर सोनवणे वस्तीजवळ हेमंत रामभाड कोथबिरे यांचे पत्र्याचे शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने रविवारी छापा टाकून 52 लाख 31 हजार 790 रुपयांच्या मुद्देमाल हस्तगत केला. जुगार खेळणार्या 24 जणांविरुद्ध कारवाई केली. त्यापैकी 22 जणांना ताब्यात घेण्यात आले असून 2 जण फरार झाले आहेत.हेमंत रामभाऊ कोथंबिरे यांचे पत्र्याचे शेडमध्ये स्वप्नील राजू खेत्रे (रा. झेंडा चौक, श्रीगोंदा) लोकांकडून पैसे घेवून तीरट नावाचा जुगार खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून देतो आणि तेथे जुगार खेळतो व खेळवितो, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानूसार पोलिस पथकाने छापा टाकत कारवाई केली. जुगारीतील 66 हजार 290 रुपये रोख, 6 लाख 10 हजार 500 रुपये किमतीचे मोबाईल, 5 हजार रुपये किमतीचे जुगार साहित्य, 45 लाख 50 हजार रुपये किमतीची चारचाकी व दुचाकी वाहने असा एकूण 52 लाख 31 लाख 790 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. महादेव प्रकाश कोहक यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.
अय्याज अहमद शेख (वय 52, रा. खाटीक गल्ली, श्रीगोंदा), सुनिल रामचंद्र घोडके (वय 43, रा. सिध्दार्थनगर, ता. श्रीगोंदा), सलमान हसन शेख (वय 29, रा. पारगाव सुद्रीक, ता. श्रीगोंदा), स्वप्नील राजू खेत्रे (वय 33, रा. झेंडा चौक, ता. श्रीगोंदा), युवराज दिनकर जाधव, वय 37, रा. स्टेशनरोड, ता. श्रीगोंदा), गणेश सूर्यकांत डावरे (वय 40, रा.स्वामी समर्थ नगर,ता.कर्जत), संजय पोपट वाल्हेकर (वय 55, रा. संजयनगर, ता. आष्टी), गहिनीनाथ भिमराव रणसिंग (वय 28, रा. मातकुळी, ता. आष्टी), गणेश कांतीलाल वैद्य (वय 38, रा. तांदळी, ता. शिरुर), भाउसाहेब दिलीप तोरडमल (वय 38, रा. भानगाव, ता. श्रीगोंदा), भगवान तात्या शिंदे (वय 62,रा. खंडके हॉस्पीटल मार्ग, ता. श्रीगोंदा), प्रमोद महादेव उदमले (वय 24, रा. रोहीदास चौक, ता. श्रीगोंदा), शब्बीर गफर पठाण (वय 63, रा. पानसरे वस्ती), ता.दौंड), सागर किशोर दिक्षीत (वय 24, रा. झेंडा चौक,ता. श्रीगोंदा), विश्वजीत श्यामराव काकडे (वय 30,रा. गोदड महाराज गल्ली, ता. कर्जत), युुनुस रफिक पठाण (वय 42, रा. म्हसोबा गेट, ता. कर्जत), भाऊ पोपट गोरे, वय 44,रा. होळी गल्ली, ता. श्रीगोंदा), संतोष रामदास साबळे (वय 33, रा. धामणगाव, ता. आष्टी), बाळु आप्पा नवले (वय 41,रा. टाकळी, ता. श्रीगोंदा), संदिप बबन माने (वय 44, रा. राशिन, ता. कर्जत), गणेश भगवान वाळुंजकर (वय 36 रा. शहाजीनगर, ता. कर्जत), योगेश दिगंबर साळवे (वय 23, रा. धामणगाव, ता. आष्टी), ताहीरखान पठाण (रा. पेडगाव, ता. श्रीगोंदा (फरार), भारत ओहळ (रा. ओहळपिंप्री, ता. श्रीगोंदा (फरार) हे जुगार खेळताना मिळून आले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गणेश अहिरे, पोलिस हेड कॉन्स्टेबल आप्पा तरटे, संग्राम जाधव, गहिनीनाथ यादव, सचिन बारे, गोरख जाधव, रवि जाधव, संदिप शिरसाठ, विवेक दवळी, मयुर तोरडमल, अरुण पवार, संदिप आजबे, महादेव कोहक, बबन साळवे यांच्या पथकाने केली.


