Sunday, November 2, 2025

अहिल्यानगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना…… अल्पवयीन मुलीवर डॉक्टरचाच अत्याचार

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात भयानक घटना घडली आहे . फरार झालेल्या डॉक्टरला काल रात्री (6 एप्रिल) संगमनेर शहर पोलिसांनी नाशिक येथून ताब्यात घेतल आहे.

शहरातील एका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल असलेल्या सोळावर्षीय अल्पवयीन मुलीवर डॉक्टरनेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.6) पहाटे घडली आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रासह संगमनेर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीवरुन, बारावीत शिकणारी सोळा वर्षीय पीडित तरुणी नवीन नगर रोड येथील एका रुग्णालयात 4 एप्रिलपासून उपचार घेत होती. दरम्यान, रविवारी पहाटे डॉ. कर्पे याने तिची विचारपूस करत रुग्णालयाच्या गच्चीवर नेले. तेथे तिच्या मनाविरुद्ध लैंगिक अत्याचार करत धमकी दिली. या धक्कादायक प्रकाराची माहिती पीडित तरुणीने आपल्या कुटुंबियांना दिली.

त्यानंतर पीडितेने शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन डॉ. अमोल कर्पे याच्यावर अत्याचारासह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक फराहनाज पटेल या करत आहे. दरम्यान, घटनेनंतर पसार झालेल्या डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने वैद्यकीय वर्तुळासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या सोळा वर्षीय अल्पवयीन युवतीला त्रास होऊ लागल्याने तिला खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले. पहाटेच्या सुमारास डॉक्टरांनी मुलीच्या प्रकृतीची चौकशी करून तिला टेरेसवर नेले व अत्याचार केल्याचा आरोप अल्पवयीन मुलीने केला आहे .या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली . कुटुंबीयांना माहिती समजतात कुटुंबीयांनी इस्पितळात धाव घेतली.. यावेळी पोलिसांनीही घटनास्थळी जात परिस्थिती हाताळत डॉक्टर अमोल कर्पे याच्यावर गुन्हा दाखल केला. घटनेनंतर आरोपी फरार असल्याने पोलिसांनी तात्काळ पथक पाठवून नाशिक येथून रात्री डॉक्टरला ताब्यात घेतल आहे. घटनेची माहिती समजल्यावर काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांची मुलगी जयश्री थोरात यांनी देखील पोलिस ठाण्यात जात आरोपीला कठोर शासन करण्याची मागणी केलीय.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles