लवकरात लवकर आझाद मैदान खाली करा, अशी नोटीस मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना दिली आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांकडून जरांगेंना नोटीस पाठवण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांचे पाच दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आता मुंबई पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. पोलिसांच्या नोटीसनंतर आता मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेतात, याकडे मराठा आंदोलकांच्या नजार खिळल्या आहेत. दरम्यान, फडणवीस यांनी गोळ्या घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली होती. त्यामुळे आता पोलिसांच्या नोटीसनंतर आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तवली जातेय.
मुंबई पोलिसांनी नोटीसमध्ये नेमकं काय म्हटलंय?
प्रति,
आमरण उपोषण अंतरवाली सराटी,
ता. अंबड, जि. जालना.
१) श्री. किशोर आबा मरकड (कोर कमिटी सदस्य),
२) श्री. पांडुरंग तारक (कोर कमिटी सदस्य),
३) श्री. शैलेंद्र मरकड (कोर कमिटी सदस्य),
४) श्री. सुदाम बष्पा मुकणे (कोर कमिटी सदस्य),
५) श्री. बाळासाहेब इंगळे (कोर कमिटी सदस्य),
६) श्री. अॅड. अमोल लहाणे (कोर कमिटी सदस्य),
७) श्री. श्रीराम कुरणकर (कोर कमिटी सदस्य),
८) श्री. संजय कटारे (कोर कमिटी सदस्य),
ज्याअर्थी, मा. मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्र. २५६५६/२०२५ (अॅमी फॉऊंडेशन वि. महाराष्ट्र राज्य व इतर) च्या सुनावणीमध्ये दिनांक २६/०८/२०२५ रोजी दिलेल्या आदेशात खालीलप्रमाणे निर्देश दिले होते :-
१) प्रतिवादी क्र. ०५, ०६ व ०७ म्हणजेच आपण स्वतः, श्री. विरेंद्र पवार व आमरण उपोषण अंतरवाली सराटी, यांनी “जाहिर सभा, आंदोलने व मिरवणूका नियम, २०२५ अन्वये सक्षम प्राधिकारी यांची परवानगी प्राप्त केल्याशिवाय आझाद मैदान, मुंबई येथे कोणतेही आंदोलन करू नये.
२) प्रतिवादी यांना असे आंदोलन करावयाचे असल्यास त्यासाठी त्यांनी “जाहिर सभा, आंदोलने व मिरवणूका नियम, २०२५” अन्वये अर्ज सादर करावा.
३) मुंबई शहरातील जनजीवन विस्कळीत होवू नये यासाठी प्रतिवादी यांना खारघर, नवी मुंबई या ठिकाणी आंदोलन करण्यास पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने विचार करावा.
४) सक्षम प्राधिकारी यांनी प्रतिवादी यांना “जाहिर सभा, आंदोलने व मिरवणूका नियम, २०२५ अन्यये आंदोलन करण्यास परवानगी दिल्यास सक्षम प्राधिकारी यांनी घालून दिलेल्या सर्व अटी व शर्तीचे पालन प्रतिवादी करतील.
आणि ज्याअर्थी, तद्नंतर आपण केलेल्या अर्जानुसार दि. २९/०८/२०२५ रोजी सकाळी ०९:०० ते १८:०० वा. दरम्यान आझाद मैदान, मुंबई येथे आपल्या मागण्यांकरीता एक दिवस आंदोलन करण्याची परवानगी या कार्यालयाचे पत्र कमांक ७६०८/२०२५, दिनांक २७/०८/२०२५ अन्यये आपणांस देण्यात आली होती. नमूद परवानगी देताना आपणांस “जाहीर सभा, आंदोलने व मिरवणुका (अपर पोलीस आयुक्त, दक्षिण विभाग, मुंबई यांच्या अधिकार क्षेत्रात) नियम, २०२५” व मा. मुंबई उच्च न्यायालय यांचे उपरोक्त नमूद प्रकरणातील दि. २६/८/२०२५ रोजीचे अंतरिम आदेशाची माहिती देण्यात आली होती. तसेच तत्पूर्वी आपणास दिनांक २६/८/२०२५ रोजीचे पत्राद्वारे मा. उच्च न्यायालयाचे उपरोक्त जर अंताि चाहे “जारमा आंदोलने व मिरवणका नियम २०२७५ या नियमावलीची पत देखील देण्यात आली.
आपणास यापूर्वी आंदोलन करण्यासाठी देण्यात आलेल्या परवानगीतील अटी व शर्तीचे आपण उल्लंघन केलेले असल्यामुळे तसेच, मा. मुंबई उच्च न्यायालयाने दिनांक २६/०८/२०२५ रोजीच्या त्यांच्या अंतरिम आदेशामध्ये दिलेल्या निर्देशांचे आपण उल्लंघन केलेले असल्याने, दिनांक ०१/०९/२०२५ रोजी आपण सादर केलेल्या विनंती अर्जानुसार (या पोलीस ठाण्याचे आवक क्रमांक ११३५/९/२०२५, दिनांक ०१/०९/२०२५) आपण मागितलेली आंदोलनाबाबतची परवानगी याद्वारे नाकारण्यात येत आहे. त्यानुसार आपण आझाद मैदान परिसर लवकरात लवकर रिक्त करावा.


