Wednesday, September 10, 2025

बीडमध्ये तणाव दोन गट आमनेसामने, पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडून नागरिकांना केलं मोठं आवाहन

राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं आहे. आरक्षणावरून मराठा आरक्षण आंदोलक आणि ओबीसी आरक्षण आंदोलक एकमेकांच्या पुढे उभे ठाकले आहेत. राज्य सरकारच्या आरक्षण जीआरचे पडसाद बीडमध्ये उमटले आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून बीडमध्ये दोन गट आमनेसामने आले. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केल्याने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. या घटनेनंतर बीडमध्ये पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. पोलिसांकडून बीडकरांना मोठं आवाहन करण्यात आलं आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. शांतता आणि सौहार्द राखावे जिल्ह्यातील शांतता भंग करण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी म्हटले आहे. कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये किंवा दोन समाजांमध्ये फूट पाडू नये, असेही त्यांनी नागरिकांना प्रसिद्धी पत्रकातून आवाहन केले आहे.

लक्ष्मण हाके यांनी गेवराई दौऱ्यावर आहेत. त्यावेळी हाके यांनी दंड थोपटल्याची कृती केली. त्याचवेळी त्यांच्या समर्थकांनी वादग्रस्त घोषणाबाजी केल्याने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. यावेळी दोन गट आमनेसामने आले. त्यामुळे बीडच्या गेवराईत तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं दिसून आलं. या प्रकरणानंतर कोणीही चुकीचे मेसेज किंवा चुकीची माहिती पसरवण्याचे काम करू नये, असेही बीड पोलिसांनी म्हटले आहे.

बीडच्या गेवराईत ओबीसी आंदोलकांनी हैदराबाद गॅझेट संदर्भात निघालेला जीआर रद्द करण्याची मागणी केली. सरकारचा निषेध व्यक्त करत ओबीसी आंदोलकांनी हैदराबाद गॅझेट संदर्भात सरकारने काढलेला जीआर तात्काळ रद्द करावा अशी मागणी केली. येत्या आठ दिवसात जर जीआर रद्द केला नाही, तर ओबीसी समाज आक्रमक होईल, अशी देखील प्रतिक्रिया ओबीसी आंदोलकांनी दिली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles