Tuesday, November 4, 2025

Ahilyanagar crime :बडतर्फ पोलिसाचे कारागृहातून महिलेला धमकीचे पत्र

अहिल्यानगर -खूनाच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या बडतर्फ पोलिसाने याच गुन्ह्यातील साक्षीदार महिलेला पत्राव्दारे धमकी दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सदरचा पत्रव्यवहार हा जिल्हा कारागृहातून झाला असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण बबन कोळपे (रा. विळद, ता. अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या त्या बडतर्फ पोलिसाचे नाव आहे. 34 वर्षीय फिर्यादी महिला शहरातील काटवन खंडोबा परिसरातील साई कॉलनीत राहतात.तर किरण कोळपे हा जिल्हा पोलीस दलात नोकरीला होता. मात्र त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्ष्यात घेता त्याला पोलीस खात्यातून बडतर्फ केले आहे. शहरातील व्यापारी दीपक परदेशी यांच्या खून प्रकरणी किरण कोळपे हा अटकेत आहे. घटना 6 सप्टेंबर रोजी घडली असून गुन्हा मंगळवारी (9 सप्टेंबर) रात्री दाखल झाला आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजि. नं. 284/2025 मध्ये साक्षीदार आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील संशयित आरोपी कोळपे याने त्यांना पत्राव्दारे धमकी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. मी पोलीस खात्यात 15 वर्षे नोकरी केलेली आहे. मी चार्जशीट (दोषारोपपत्र) पाहिले असून तपासी अंमलदार व साक्षीदार यांना सोडणार नाही, असा मजकूर संशयित आरोपीने लिहिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

दरम्यान, फिर्यादीने किरण कोळपे विरोधात पूर्वीही अनेक वेळा पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या असून, धमकीचे पत्र जिल्हा कारागृह, अहिल्यानगर येथून पाठविण्यात आले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles