सातारा परिसरातील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाने शिक्षकेला अर्जित रजा मंजूर करण्यासाठी तब्बल २० हजार रुपयांची लाच मागितली. लाच देण्याची इच्छा नसलेल्या शिक्षिकेने एसीबीकडे तक्रार केली. ठरल्याप्रमाणे शिक्षिकेने ओढणी झटकली अन् २० हजार रुपयाची लाच घेताना पंटरसह मुख्याध्यापक रंगेहाथ पकडला. सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्याध्यापक सोमनाथ भागोजी भावले, वय ५२ वर्ष, राहणार वसंत विहार, बीड बायपास, पंटर -शाळेतील संगणक ऑपरेटर गणेश रामनाथ कोथिंबीरे, वय २६ वर्ष, राहणार सातारा गाव, अशी आरोपींची नावे आहेत.दरम्यान या प्रकरणी अधिक माहिती अशी की, तक्रारदार महिलेने मुख्याध्यापक सोमनाथ भावले याच्याकडे अर्जित रजा मंजूर करण्यासाठी अर्ज केला होता. मात्र रजा मंजूर करण्यासाठी भावले यांनी ऑपरेटर कोथिंबीरेच्या माध्यमातून शिक्षिकेकडे वीस हजारांची लाच मागितली. लाच देण्याची इच्छा नसल्याने शिक्षिकेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
 एसीबीने ठरल्यानुसार सापळा रचला. ठरल्यानुसार शिक्षक महिलेने ऑपरेटर कोथिंबीरे याच्याकडे मुख्याध्यापक भावले यांच्या सांगण्यावरून वीस हजार रुपये दिले. एसीबीने सांगितल्यानुसार पैसे देताच महिला शिक्षकांनी ओढणी झटकून पथकाला इशारा दिला. याच वेळी पथकाने तात्काळ ताब्यात घेऊन दोघांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून २० हजार रुपयाची लाचेची रक्कम दोन मोबाईल जप्त करण्यात आली आहे.ही कारवाई अधीक्षक माधुरी कांगणे, उपाधीक्षक संगीता पाटील यांच्या पथकातील जमादार सचिन बारसे यांनी केली. या प्रकरणी सा


