Tuesday, November 4, 2025

Ahilyanagar crime : हॉटेलमध्ये वेश्या व्यवसायावर छापा हॉटेल चालक व मालक यांच्या विरुद्ध गुन्हा

शिर्डी शहरातील हॉटेल क्रांती या हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती काल मिळाली होती. त्यानुसार श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी येथील वाचक पोलीस उपनिरीक्षक खोंडे यांना सदर प्रकरणी पडताळणी करून सत्यता असल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते.त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक खोंडे यांनी बोगस ग्राहक पाठवून वेश्या व्यवसायासंबंधाने खात्री केली असता सदर हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याबाबतची खात्री पटली. त्या अनुषंगाने सविस्तर पंचनामा करण्यात आला. सदर हॉटेलमध्ये दोन पिडित महिला मिळून आल्या असून सदर पीडित महिलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना निवारागृहात पाठवण्यात आले आहे.

वेश्या व्यवसायावर उपजीविका करणारे हॉटेल चालक व मालक यांच्या विरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम 3,4,5,7,8 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. घटनास्थळावरून सुमारे 32 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे हे करत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles