Tuesday, November 4, 2025

सभापती प्रा.राम शिंदेंनी अनुभवला मेट्रो प्रवास करण्याचा प्रवास…. म्हणाले ; गर्दी आणि वेळेची बचत

आज बंगलोर शहरातील जे. पी. नगर मेट्रो स्टेशन ते विधान सौद्धा मेट्रो स्टेशन असा मेट्रो प्रवास करण्याचा अनुभव घेतला.
लोकांच्या दैनंदिन जीवनातील गडबड, गर्दी आणि वेळेची बचत या सगळ्याला उत्तर म्हणजे मेट्रोसारखी आधुनिक, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था. स्वच्छ डबे, वेळेवर धावणारी सेवा आणि प्रवाशांच्या चेहऱ्यावरचा समाधान, हीच खरी नवी भारताची ओळख आहे.
हा बदल शक्य झाला आहे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे. शहरी भागांना आधुनिक वाहतूक सुविधा, प्रदूषणमुक्त वातावरण आणि “ईज ऑफ लिव्हिंग” यांची हमी देण्याचा त्यांचा संकल्प या मेट्रोच्या यशातून स्पष्टपणे दिसतो.
महाराष्ट्रातील शहरांतही अशीच अत्याधुनिक आणि लोकाभिमुख व्यवस्था निर्माण होऊन जनतेच्या जीवनात सुलभता आणि गती येईल, याची खात्री वाटते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles