Tuesday, November 4, 2025

नगरमध्ये शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नावर अधिकाऱ्यांना घेतले फैलावर, आमदार किशोर दराडे यांचा शिक्षक दरबार

अहिल्यानगर: शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेमध्ये आयोजित केलेल्या शिक्षक दरबारामध्ये जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत अनेक मुद्द्यांवर फैलावर घेतले.

यावेळी शिक्षणाधिकारी भास्कर पाटील (प्राथमिक) व संध्या गायकवाड (माध्यमिक) यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी तसेच माध्यमिक शिक्षक सोसायटीचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित, सचिव संभाजी पवार, स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे प्रसाद शिंदे, सुनील दानवे, ज्ञानदेव बेरड, भाऊसाहेब रोहकले, मिथुन डोंगरे, जळगावमधील शिक्षक नेते संभाजी पाटील आदींसह शिक्षक व शिक्षकेतर उपस्थित होते.

शिक्षकांनी दरबारात अनुकंपाधारकांची मान्यता, शालार्थ आयडी, प्राचार्य मान्यता, निवडश्रेणी मान्यता, शाळा स्वमान्यता, आरटीई प्रलंबित मान्यता, संचमान्यता (सन २०२४-२५) वाटप, मुख्याध्यापक रजा रोखीकरण, फरक देयके प्रकरणे, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांचे प्रमाणपत्र, अंशतः अनुदानित शाळांचा वाढीव टप्पा, तसेच रिक्त पदे भरणे आदी प्रश्न उपस्थित केले. सन २०२२ पासूनच्या पीएफ स्लिप उपलब्ध करून देण्याची मागणी झाली.

आमदार दराडे यांनी या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना विचारणा केली. हा दरबार म्हणजे शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याचे व्यासपीठ आहे, अधिकाऱ्यांना त्रास देण्याचा हेतू नाही. समन्वयाअभावी प्रश्न प्रलंबित राहतात, आता त्यावर तोडगा निघेल, असे स्पष्ट केले. शिक्षक दरबाराचे नियोजन वैभव सांगळे व हरीश मुंडे यांनी केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles