सुप्रीम कोर्टाचे वकील अहिल्यानगरचे सुपुत्र, अण्णासाहेब शिंदे यांचे नातू सिद्धार्थ शिंदे यांचं दिल्लीमध्ये निधन

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील ख्यातनाम वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचे सोमवारी (१५ सप्टेंबर २०२५) रात्री अचानक निधन झाले. वयाच्या अवघ्या ४८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अकाली जाण्याने विधी क्षेत्रात तसेच महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मूळचे श्रीरामपूर (अहिल्यानगर) येथील रहिवासी, दिल्लीत सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे (वय ४८) यांचे निधन. पुण्यात अंत्यसंस्कार. महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष खटल्याची सोप्या भाषेत देत असत माहिती.
माजी केंद्रीय कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे सिद्धार्थ शिंदे हे नातू होत.
सोमवारी ते नेहमीप्रमाणे न्यायालयीन कामासाठी गेले असता अचानक त्यांना चक्कर आली. तत्काळ त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
शिंदे कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यात स्थायिक झाले आहे. सिद्धार्थ यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

त्यांचे पार्थिव मंगळवारी (१६ सप्टेंबर) सकाळी नवी दिल्लीहून पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी आणले जाणार आहे. दुपारी १ वाजता रविवार पेठेतील वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles