मराठवाड्यातील बीडकरांसाठी ऐतिहासिक क्षण आणि जिल्ह्याच्या विकासाला गती देणारा सोहळा आज नव्याने उभारण्यात आलेल्या बीड रेल्वे स्थानकावर संपन्न झाला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री पंकजा मुंडे, खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह बीड जिल्ह्यातील सर्वच आमदार आणि कानाकोपऱ्यातून आलेल्या जनतेच्या उपस्थितीत हा सोहळा राजकीय टोले आणि श्रेयवादाच्या फटाक्यांनी गाजला. व्यासपीठावरुन भाषण करणाऱ्या सर्वच राजकीय नेत्यांनी बीड (Beed) रेल्वेच्या आठवणींना उजाळा दिला, रेल्वेसाठी केलेल्या संघर्षाची आठवण सांगितली. त्यानंतर, बीड-अहिल्यानगर रेल्वे मार्गावर पहिल्यांदा रेल्वे धावली. मंत्री महोदयांनी हिरवी झेंडी दाखवली अन् रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांनी फोटो, व्हिडिओसह आनंद साजरा केला. पहिल्याच दिवशी प्रवाशांनी बीड ते अहिल्यानगर प्रवासासाठी मार्गक्रमण केले.
बीड-अहिल्यानगर-परळी मार्गावर ही रेल्वे धावणार असून पहिल्या टप्प्यात आज बीड ते अहिल्यानगर या 167 किमी मार्गावर बीडकरांचा प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे, बीड ते अहिल्यानगर रेल्वेने बीडकरांना प्रवास करता येईल, विशेष म्हणजे या प्रवासाचे तिकीटदरही समोर आले असून कमीत कमी 10 रुपये ते जास्तीत जास्त 40 रुपयांपर्यंतचे तिकीट दर आकारण्यात येणार आहेत. म्हणजेच, बीडहून केवळ 40 रुपयांत अहिल्यानगरला जाता येईल. बीड ते अहिल्यानगर या रेल्वे प्रवासात एकूण 15 रेल्वे स्थानक असणार आहे. पहिले स्टेशन राजुरी नवगण असून बीडवरुन फक्त 10 रुपयांत येथे जाता येईल. अहिल्यानगर-बीड-परळी हा संपूर्ण रेल्वेमार्ग 261 किमीचा आहे. त्यापैकी, आज फक्त बीड-अहिल्यानगर या 166 किमी मार्गाचा टप्पा प्रवाशांसाठी सुरू करण्यात आला आहे. उर्वरीत बीड-परळी टप्प्यातील काम अद्याप बाकी आहे.बीडचे नवे रेल्वे स्टेशन हे बीड बस स्टँडपासून 6 किलोमीटर दूर पालवण गावात आहे. बीड ते अहिल्यानगर डेमू रेल्वेचे तिकीट 40 रुपये एवढे ठेवण्यात आलं आहे. मात्र, बीड शहरापासून 6 किमी दूर असलेल्या रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी रिक्षावाले 150 ते 200 रुपयांपर्यंत भाडे आकारू शकतात, असे सांगण्यात येते.
बीडमधून
अहिल्यानगरसाठी
दुपारी 1 वाजता निघणार
ट्रेन
बीड-अहिल्यानगर रस्ता कापण्यासाठी बाय रोड अडीच ते पावणे ती तास लागतात. मात्र, या रेल्वेने किमान 5.30 तास लागणार आहेत. कारण, सरासरी डेमू रेल्वेचा वेग 30 किमी प्रती तास असेल. या मार्गावर दररोज एक गाडी येणार असून गाडी क्रमांक 71441, सकाळी 6.55 वाजता अहिल्यानगरवरुन निघणार असून ती 12.30 वाजता बीडला पोहोचणार आहे. तर, तीच गाडी क्रमांक 71442, दुपारी 1 वाजता परत अहिल्यानगरसाठी जाणार असून सायंकाळी, 6.30 वाजता अहिल्यानगरला पोहोचणार आहे. आठवड्यातील सहा दिवस ही रेल्वे धावणार आहे.
बीड ते अहिल्यानग असा 167 किमीचे अंतर ही रेल्वे कापणार आहे. त्यामध्ये बीडसह एकूण 15 स्थानकांचा समावेश आहे.
बीड
रायमोह
रायमोहा
विघनवाडी
जाटनांदूर
अळमनेर
हतोला
वेताळवाडी
न्यू आष्टी
कडा
न्यू धानोरा
सोलापूरवाडी
न्यू लोणी
नारायणडोहो
अहिल्यानगर


