महापालिकेचा सूर्योदय झाला, अवैध कत्तलखान्यावर कारवाई सुरू…
अहिल्यानगर शहरातील कोठलास्टॅंड येथे अवैध कत्तलखाने व रस्त्यावर मांस टाकल्याप्रकरणी आमदार संग्राम जगताप आणि आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनात करण्यात आले. त्यावेळी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी सूर्योदय होताच कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.
हा सूर्योदय आज झाला. आज भल्या सकाळी पोलिस बंदोबस्तात महापालिकेचे पथक झेंडी गेट भागात दाखल झाले. आता पर्यंत ५ कत्तलखाने उध्वस्थ करण्यात आले आहेत. जेसीबीच्या सह्याने हे काम सुरू आहे. काही ठिकाणी जेसीबी जात नाही, अशी स्थिती आहे. तेथे कर्मचारी जाऊन पाडकाम करीत आहेत. दिवसभरात झेंडी गेट भागात कारवाई करण्यात येईल. त्यानंतर अन्यठिकाणी शोध मोहीम राबविली जाणार आहे.
तर दुसरीकडे महामार्ग प्रशासनानेही मनावर घेतले आहे. शहरातून जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर रस्त्याची साफसफाई करण्यात येत आहे. दुर्गंधीचा सर्वाधिक त्रास असलेल्या कोठला स्टॅंडपर्यंत ही मोहीम आली आहे. लवकरच ही समस्या दूर होईल, ही अपेक्षा. अर्थात सातत्य हवे.
अहिल्यानगर शहरातील कोठलास्टॅंड येथे अवैध कत्तलखान्यावर कारवाई सुरू…
- Advertisement -


