*डाळींब व लिंबूवर्गीय फळपिक उत्पादक शेतकऱ्यांसाठी*
*ऑनलाईन वेबिनारचे आयोजन*
अहिल्यानगर, – डाळींब व लिंबूवर्गीय फळपिकांवर येणाऱ्या किडरोगांचे नियंत्रण व व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी १९ व २४ सप्टेंबर २०२५ रोजी ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या वेबिनारचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे.
डाळींब फळपिकांवरील किडरोग नियंत्रण व व्यवस्थापन या विषयावर १९ सप्टेंबर रोजी वेबिनार होणार आहे. यात कृषी आयुक्तालय, पुणे येथील फलोत्पादन संचालक अंकुश माने व महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील शास्त्रज्ञ डॉ. प्रकाश मोरे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील.
लिंबूवर्गीय फळपिकांवरील किडरोग नियंत्रण व व्यवस्थापन या विषयावर २४ सप्टेंबर २०२५ रोजी वेबिनार होईल. यात फलोत्पादन संचालक अंकुश माने व नागपूर येथील राष्ट्रीय लिंबूवर्गीय संशोधन केंद्राचे डॉ. नरेश मेश्राम शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व डाळींब व लिंबूवर्गीय फळपिकांचे उत्पादक शेतकऱ्यांनी या ऑनलाईन वेबिनारचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी नजीकच्या सहायक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.


