Tuesday, October 28, 2025

भरवर्गात ”चिकनी चमेली’ गाण्यावर तरुणीने केला तुफान डान्स….व्हिडीओ

कॉलेजमधील काळ हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वांत अविस्मरणीय काळ असतो. कॉलेजमधील असंख्य आठवणी असतात, ज्या आयुष्यभर आनंद देतात. कॉलेजमधील अभ्यास, मजामस्ती, पिकनिक, फ्रेशर्स पार्टी, वार्षिक समारंभ, विविध प्रकारचे इव्हेंट या सगळ्यांमुळे ते दिवस कसे संपतात तेच कळत नाही. सध्या एका कॉलेजातील फ्रेशर्स पार्टीचा एक व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर सतत बॉलीवूडमधील नवी-जुनी गाणी पुन्हा पुन्हा चर्चेत येत असतात. या गाण्यांवर लहानांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण जमेल तसा डान्स करतो. त्यातील काही व्हिडीओ खूप चर्चेतही येतात. सध्या एका कॉलेजमधील फ्रेशर्स पार्टीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात एक तरुणी खूप सुंदर डान्स करताना दिसतेय.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरूणी कॉलेजमधील एका वर्गात फ्रेशर्स-डे निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात डान्स करतेय. यावेळी ती भरवर्गात सर्वांसमोर ‘चिकनी चमेली’ या गाण्यावर डान्स करतेय. तिचा हा डान्स पाहून पुढे बसलेले सर्वजण मोठमोठ्या किंचाळून आणि टाळ्या, शिट्ट्या वाजवून तिला प्रोत्साहन देतात. तिचा हा सुंदर डान्स सध्या खूपच चर्चेत आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @ashritatamuli_official या अकाउन्टवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत ३१ मिलियन व्ह्यूज आणि तब्बल २ मिलियन लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक नेटकरी या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलंय की, “आजकालचे कॉलेज खूप चांगले आहेत, नाहीतर आमच्यावेळी…”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “खूपच छान डान्स करतेय ही”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “आईशप्पथ किती सुंदर नाचली”

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles