चास घाटाजवळ नगर – पुणे रोडवर दरोड्याचे तयारीत असलेला कुख्यात गुंड त्याचे इतर 4 साथीदार, 7,90,600/- रू. किमतीचे मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद
 –
 प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, मा. श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी पोनि/श्री. किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना जिल्ह्यातील मालाविरुध्दचे गंभीर स्वरुपाचे ना उघड गुन्हे उघडकिस आणणे व गुन्ह्यांना आवश्यक ते प्रतिबंध करणेबाबत आदेश दिलेले आहेत.
 नमुद आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील सपोनि/हरिष भोये, पोउपनि/ अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार लक्ष्मण खोकले, ह्दय घोडके, दिपक घाटकर, राहुल द्वारके, सुरेश माळी, अतुल लोटके, भिमराज खर्से, बाळासाहेब नागरगोजे, रिचर्ड गायकवाड, राहुल डोखे, सोमनाथ झांबरे, भगवान थोरात, विशाल तनपुरे, योगेश कर्डिले, भगवान धुळे, महादेव भांड यांचे पथक तयार करुन मालाविरुध्दचे गुन्हे उघडकिस आणणे बाबत सुचना देवुन पथकास रवाना केले होते.
 दिनांक 20/09/2025 रोजी रात्री तपास पथक नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना सपोनि/हरिष भोये यांना गुप्तबातमीदारा मार्फत अहिल्यानगर ते पुणे जाणारे रोडवर चास घाटाजवळ एक काळ्या रंगाचे इनोव्हा वाहन क्रमांक एम. एच. 01. व्ही. ए. 7422 हिचेमधुन गौरव घायाळ व त्याचेबरोबर 3 ते 4 इसम दरोडा घालण्याचे तयारीत अंधारात थांबलेले असल्याचे खात्रीशीर माहिती मिळाली. पथकाने बातमीतील ठिकाणी दिनांक 20/09/2025 रोजी रात्री 03.50 वा. चे सुमारास जावुन खात्री केली असता चास घाटाच्या अलीकडे एक काळ्या रंगाचे इनोव्हा वाहन क्रमांक एम.एच.01. व्ही. ए. 7422 रोडचे कडेला अंधारामध्ये थांबल्याचे दिसुन आले. पथकानी सदर इसमांना शिताफीने ताब्यात घेवुन त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे 1) गौरव हरीभाऊ घायाळ वय-24 वर्षे रा. सुपा ता. पारनेर जि. अहिल्यानगर, 2) सतिष बाळासाहेब पावडे वय-35 वर्षे, मुळ रा. दरोडी, ता. पारनेर हल्ली रा. सुपा, ता.पारनेर, जि. अहिल्यानगर, 3) अनिकेत रमेश साळवे वय- 29 वर्षे रा.ओम एन्टरप्रायजेसच्या पाठीमागे, सुपा ता. पारनेर, जि. अहिल्यानगर, 4) विशाल सुरेश जाधव वय-23 वर्षे रा. अपधुप रोड, सुपा, ता. पारनेर जि. अहिल्यानगर, 5) गोविंद बबनराव गाडे वय-36 वर्षे रा. ग्रामपंचायत मागे, सुपा, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले.
 ताब्यात घेतलेल्या संशयीतांना अंधारात थांबण्याचे कारण विचारले असता त्यांनी काहीएक समाधान कारक उत्तर दिले नाही. पथकाने पंचासमक्ष संशयीतांची अंगझडती घेता त्यांचे कब्जात 30,000/- रु किमतीचे 1 पिस्टल व 1 जिवंत काडतुस, 500/- रुपये किमतीचे 1 तलवार, 100/- रु कि.चे 1 गिलव्हर, 1 बेसबॉलचा दांडका, 60,000/- रुपये किमतीचे 6 वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल, 7,00,000/- रु किमतची एक इनोव्हा चारचाकी वाहन, असा एकुण 7,90,600/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नगर – पुणे रोडवर चास जवळ दरोड्याचे तयारीत असलेला कुख्यात गुंड त्याचे इतर 4 साथीदार जेरबंद
- Advertisement -


