Wednesday, October 29, 2025

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पारनेर दौऱ्याला विरोध, गो बॅकचे नारे देत आंदोलन करणार

उपमुख्यमंत्री अजित पवार हे दि. 2 ऑक्टोबरला दसरा मेळाव्याचे निमित्ताने पारनेर दौऱ्यावर येत असल्याचे समजताच त्यांच्या नियोजित दौऱ्याला अजित पवार – गो – बॅक आंदोलनाने विरोध करण्याचा इशारा पारनेर कारखाना बचाव समिती व भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने दिला आहे.भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर व लोक जागृती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रामदास घावटे यांची व सामाजिक संघटनांची पारनेर येथे बैठक झाली. याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील देवीभोयरे येथील सहकारी साखर कारखाना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने बेकायदा विक्री केल्या प्रकरणी पारनेर न्यायालयाच्या आदेशानंतर बँकेचे दोन अधिकारी व पुण्याच्या क्रांती शुगर या खाजगी कंपणी विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतचा तपास सध्या चालु आहे. क्रांती शुगर हि खाजगी कंपणी असुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवतयांची असल्याने या प्रकरणी पारनेरकरांवरील झालेला अन्याय दुर करण्याचे आश्वासन गत वष निवडणुकांचे वेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी पारनेरकरांना दिले होते.

कारखाना बचाव समितीने पारनेर तहसिलदार व पोलिसांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, गत वष दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करणे कामी कारखाना बचाव समितीने त्यांच्या पक्षाचे पारनेरचे विधानसभा सदस्य काशिनाथ दाते व पक्षाचे पदाधिकारी यांना वर्षभर वारंवार भेटून दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेची मागणी केलेली होती. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत कोणताही निर्णय अद्याप पर्यंत घेतलेला नाही.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शब्दावर विश्वास ठेवून पारनेरकरांनी त्यांच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार यांना विधानसभा निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी केलेले होते. परंतु त्यानंतर आम्हाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे या प्रकरणी त्यांचे लक्ष वेधण्याकरिता पारनेर साखर कारखाना बचाव समितीने त्यांच्या नियोजित पारनेर दौऱ्यावेळी अजित पवार – गो बॅक, अजित पवार – परत जा असे आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे आंदोलन आमच्या मागण्यांचे बाबत लक्ष वेधण्याकरता करण्यात येणार असल्याची माहिती संघटनांच्या वतीने देण्यात आली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles